काेराेनामुळे शाळा बंद; विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमालकांवर आत्महत्येची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:55 AM2021-05-02T07:55:30+5:302021-05-02T07:55:48+5:30

वाढता संसर्ग, लाॅकडाऊनचा फटका

School closed due to Kareena; Time for suicide on bus owners transporting students | काेराेनामुळे शाळा बंद; विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमालकांवर आत्महत्येची वेळ

काेराेनामुळे शाळा बंद; विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमालकांवर आत्महत्येची वेळ

Next

वाढत्या काेराेना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. वर्षभरापासून शाळा बंद असून ऑनलाइन क्लासेस सुरू होते. त्यामुळे वर्षाहून अधिक काळ शालेय बस नुसत्याच उभ्या आहेत. या बसचे मालक, चालक, क्लीनर, महिला सहायक असे सर्वच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याबाबत स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांच्याशी साधलेला संवाद.

कोरोनाचा शालेय बसचालकांवर कसा परिणाम झाला?
राज्यात ४० हजार शालेय बस आणि ७० हजार शालेय व्हॅन आहेत. कोरोनामुळे बसमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. गाडीसाठी ज्या बँकांकडून कर्ज घेतले आहे त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. गाड्या उभ्या आहेत, एका रुपयाची कमाई नाही, कर विमा तर भरावा लागतो ना, ताे कसा भरायचा, हा प्रश्न आहे. बसचालक, क्लीनर आणि महिला सहायक यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच राज्यात सात जणांनी आत्महत्या केली आहे.
शालेय बसमालक घराचा गाडा कसा हाकत आहेत?

कोरोनामुळे बसचालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्याकडे आठ ते दहा गाड्या आहेत, पण त्या उभ्या आहेत. बसचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. काही बसमालक गाड्या धुणे, भाजीपाला विकणे, एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करत आहेत.

कोरोनाच्या काळात सरकारने काही मदत केली आहे?
सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मदतीसाठी विनंती केली होती, मात्र केवळ आश्वासने मिळाली. आमचे जे ईएसआयसीचे पैसे पडून आहेत तेच मागितले आहेत, मात्र तेही दिले जात नाहीत. सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. एकीकडे केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योजना राबवीत आहे, पण आता शालेय बसमालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
(मुलाखत : नितीन जगताप)

उदरनिर्वाह करणे अवघड
काेराेनामुळे मुंबई क्षेत्रात, शहर, उपनरात शाळा बंद आहेत. साहजिकच शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचालकांच्या बसची चाके थांबली आहेत. ही चाके थांबल्याने त्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. बस चालकांसह, मालकांची स्थिती बिकट झाली आहे. उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

Web Title: School closed due to Kareena; Time for suicide on bus owners transporting students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.