Join us

शाळा बंद तरी शिक्षण सुरू! शाळा, शिक्षक आणि पालकांचा गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:18 AM

अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या आपत्तीकाळात शाळा बंद असताना वेगवेगळे मार्ग वापरून मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी धडपडणारे शिक्षक आणि घरी बसून आॅनलाईन शिक्षणाशी जुळवून घेणाऱ्या मुलांना मदत करणारे पालक यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेणारा ‘ऊर्जा’ हा उपक्रम ‘लोकमत’च्या वतीने दिनांक १५ जूनपासून चालवण्यात आला . या उपक्रमामध्ये ‘युनिसेफ’चा विशेष सहभाग होता.अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे. या गौरवासाठी पात्र ठरलेल्या शाळा, शिक्षक आणि पालकांची नावे यासोबत जाहीर करण्यात येत आहेत. या सर्वांनी आपले संपर्क क्रमांक urja@lokmat.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत!कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉॅकडाऊन जाहीर झाला आणि राज्यातील शाळाही बंद झाल्या. परंतु अनेक शाळांनी उपक्रमशीलता दाखवत शाळाच थेट विद्यार्थ्यांच्या दारात थाटली. त्यामुळे पारावर भरलेली शाळा, असे दृश्य ठिकठिकाणी पहायला मिळाले.गौरवासाठी पात्र ठरलेल्या पालकांची नावे!शिल्पा दातार जोशी, नाशिक । अपूर्वा वैद्य, नाशिकस्मिता पाटील, पुणे । सुवर्णा पाखरे, औरंगाबादभाऊसाहेब आहेर, पुणे । लक्ष्मण धांड, नाशिकशुभांगी चेतन । मोहिनी घारपुरे देशमुख, नागपूररागिणी चंदनसे, औरंगाबाद । डॉ. पल्लवी कुलकर्णीभारती ठाकरे लुंगे, नागपूरसर्व उपक्रमशीलशाळा, शिक्षकांची नावे१) नारायण शिंदे, जि. प. प्राथमिक शाळा, कळंबस्ते, जि. रत्नागिरी२) प्रवीणक्षीरसागरजि. प. प्राथमिक शाळा, जि. सातारा३) बालाजी जाधव, जि. प. शाळा, विजयनगर, माण, जि. सातारा४) अमोल हंकारे,जि. प. शाळा, खोतवस्ती, सांगली.५) मुबारक सय्यद, जि. प. खराशी, जि. गोंदिया.६) एकनाथ पवार,जि. प. शाळा, बोरीमजरा, जि. नागपूर७) शीतल झरेकर, प्रवरासंगमप्राथमिक शाळा, प्रवरानगर, अहमदनगर८) तानाजी माने,शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर९) दिलीप नरशी गावित१०) भाग्येश्वर भुतेकर, माध्यमिक विद्यालय,बनेवाडी, जि. औरंगाबाद११) कल्याण भागवत, जि. प. शाळा,मोरेवाडी, ता. माण,सातारा१२) रोहिणी लोखंडे,जि. प. नांदूर शाळा ता. दौंड१३) अरूणा पवार, अचांडे तांडा, जिल्हा धुळे१४) बाळासाहेब बोराडे, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र ,राजूर, जि. जालना१५) वरूणाक्षी आंद्रे, जि. प. शाळा,शिशुपाड, डहाणू१६) प्रदीप देवरे, जि. प. शाळा बोकडदरे,जि. नाशिक१७) अंजली गोडसे, जि. प.शाळा, बिरामणेवाडी,जि. सातारा.१८) रणजितसिंह डिसले१९) आनंद निकेतन शाळा, नाशिक२०) मंगला आहेर गावडेमहात्मा विद्यालय, भोसरी२१) पी.व्ही म्हैसनवाड,दहीफळ शाळा, भोंगणे, जि. जालना२२) प्रकाश चव्हाण, जि. प. शाळा करंजवण,दिंडोरी, जि. नाशिक२३) ध्रुवास राठोड, शासकीय निवास शाळा,चाळीसगाव२४) अनिल चव्हाण, बोराखेडी,ता.मोताळा, जि. बुलढाणा२५) जिभाऊ निकम, जि. प. शाळा भेंडी,कळवण, नाशिक२६) राजन गरूड, कर्दळ शाळाजिल्हा परिषद, जालना२७) अंबिके गुरूजी, नेणवली शाळा,नेणवली,जि. रायगड२८) कल्पना घाडगे, जि.प. अरण शाळा, सोलापूर२९) अमोल पाटील, कल्याण३०) कुंदा बच्छाव,मनपा शाळा क्रमांक १८, नाशिक३१) विजयकुमार वसंतपुरे, आंदेवाडी जि.प.शाळा. ता. अक्कलकोट, जि. सोलापूर३२) राजेश कोगदे, जि. प.मराठीशाळा,हिंगणा जि. बुलढाणा३३) जि. प.प्राथमिक शाळा,पालंदूर, ता. लाखनी, जि. भंडारा३४) नामदेव शालिग्राम महाजन, जि. प.शाळा,ता. मोंढाळा, जि. भुसावळ३५) जि. प. शाळा, सिलेगाव केंद्र,गणखैरा, जि. गोंदिया३६) जि. प. शाळा, दत्तवाडी,ता. सोयगाव, औरंगाबाद३७) संतोष मुसळे, जालना

टॅग्स :शाळाशिक्षणविद्यार्थी