मुंबई : मंगलमूर्ती गणेशाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. लोकमत आणि सर्फ एक्सेलकडून ‘आपले बाप्पा’ या शीर्षकाखाली या वर्षीचा गणेशोत्सवाचा शुभारंभ मूर्ती तयार करण्यापासून झाला आहे. महाराष्ट्रातील ७५ शाळांतील एकूण ७,५०० विद्यार्थ्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले असून, उद्या सोमवारी त्याचा शेवटचा दिवस आहे. परवा १५ सप्टेंबर रोजी या शाळांमध्ये त्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री केली जाईल.फक्त शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा उपक्रम पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिक अशा परिसरातील शाळांमध्ये भरवण्यात आला. मूर्तिकलेचे हे शिबिर मुलांना मातीच्या डागांसोबत बरेच काही अनुभव देणारे ठरले आहे. माती भिजविणे, त्याला आकार देणे, वाळविणे आणि रंग देणे हे सर्व या प्रशिक्षणात विद्यार्थी शिकले.प्रत्येक आईला आपल्या मुलाने खेळावे व त्याचसोबत चांगले शिकावे, चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या, असे मनापासून वाटत असते. पण त्यासोबत त्याच्या कपड्यांची होणारी घाणेरडी अवस्था याबद्दल ती कायम काळजीत असते़ आणि म्हणूनच एक नामांकित आणि खात्रीचे पाऊल प्रत्येक आईला आश्वस्त करण्यासाठी, काळजीमुक्त करण्यासाठी आणि प्रत्येक आईच्या लाडक्या मुलाला पूर्णपणे सुरक्षित व संपूर्ण विकासासाठी़ सर्फ एक्सेल प्रत्येक मुलाला प्रोत्साहित करणार आहे की धुळीपासून, डागांपासून काहीतरी शिकण्यासारखे आहे. पालकांनीसुद्धा सर्फ एक्सेलच्या मूल्यांची जपणूक करायला हवी, ज्यात प्रेमाची उत्कटता, जवळीकता, त्याग, क्षमाभाव, विश्वास आणि योग्य-अयोग्य निर्णयक्षमता या बाबींचा अंतर्भाव आहे. (प्र्रतिनिधी)
शाडूच्या गणेशमूर्तींची भरली शाळा
By admin | Published: September 14, 2015 3:08 AM