Join us

शाळेच्या गेटचे ‘डम्पिंग ग्राउंड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:57 AM

देशभरात सरकार ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत असून, त्यात शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या मालवणीत सात शाळांच्या गेटचे डम्पिंग ग्राउंड करण्याचा प्रताप

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : देशभरात सरकार ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत असून, त्यात शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या मालवणीत सात शाळांच्या गेटचे डम्पिंग ग्राउंड करण्याचा प्रताप पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. ज्यामुळे शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना विविध आजारांची लागण होण्याची भीती शिक्षकांना सतावत आहे. या विरोधात गांधी जयंतीदिवशी शिक्षक आणि विश्वस्तांकडून सत्याग्रह केला जाणार आहे.मालवणीत पालिकेच्या सेंट पॉल, भारतमाता, लिटिल वर्ल्ड, शफत इस्लामिक शाळा अशा एकंदर सात शाळा आहेत, ज्यात जवळपास आठ हजार विद्यार्थी सध्या शिकत आहेत. या शाळांमध्ये जाण्याच्या मार्गावरच सकाळच्या वेळी कचºयाच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे शिक्षक, तसेच पालकांचे म्हणणे आहे. सेंट पॉल शाळेत अडीच हजार, तर उत्कर्ष शाळेत अडीचशे विद्यार्थी आहेत.या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा जमा करून भरला जातो. त्यामुळे शाळेतील वर्गात असलेल्या मुलांना या कचºयाचा उग्र वास सहन करावा लागतो, तसेच त्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असल्याचे, शाळेचे शिक्षक, तसेच वंदे मातरम या खासगी शिक्षण संस्थेचे सचिव फिरोज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पालिकेकडे तक्रार करत आहोत, पण याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे २ आॅक्टोबर रोजी पालिकेच्या पी उत्तर विभागात एक सत्याग्रह करणार आहोत. या पालिका कार्यालयाच्या आवारात साफसफाई करून निषेध व्यक्त केला जाणार आहे, ज्यात सहा शाळांचे शिक्षक आणि विश्वस्थांचा समावेश असल्याचे शेख म्हणाले.‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा : गेल्या वर्षीदेखील मालवणीतील शाळांच्या या कचºयाबाबतच्या समस्येचा ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. तेव्हा तातडीने हा कचरा पालिकेच्या पी उत्तरच्या घनकचरा विभागाने उचलला, तसेच या गाड्या शाळेपासून काही अंतर दूर उभ्या करण्याचेही आश्वासन संबंधित अधिकाºयांनी दिले होते. मात्र, पुन्हा गेल्या काही महिन्यांपासून या गेटचे डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता सत्याग्रहाचा मार्ग स्वीकाराल्याचे शेख यांनी नमूद केले.