शाळांची मैदाने वाहन प्रशिक्षणासाठी? सुट्टीच्या दिवशी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 02:09 AM2021-02-12T02:09:35+5:302021-02-12T02:09:51+5:30

मुंबईत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी जागा आहेत; पण त्याचा वाहन प्रशिक्षणासाठी वापर करता येणार नाही.

School grounds for vehicle training? | शाळांची मैदाने वाहन प्रशिक्षणासाठी? सुट्टीच्या दिवशी उपक्रम

शाळांची मैदाने वाहन प्रशिक्षणासाठी? सुट्टीच्या दिवशी उपक्रम

Next

मुंबई : राज्यात ५० ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार आहेत; पण मुंबईत जागेचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे सुटीच्या वेळी शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांवर अशी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उभारता येतील का, याची चाचपणी केली जाणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबईत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी जागा आहेत; पण त्याचा वाहन प्रशिक्षणासाठी वापर करता येणार नाही. शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांचा वापर शनिवार- रविवार सुटीच्या दिवसांत मोटार ट्रेनिंग स्कूलसाठी वापरता येऊ शकतात. ज्या शैक्षणिक संस्था स्वतः मोटार ट्रेनिंग सेंटर चालविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनाही यासंदर्भात प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

राज्यात २२ ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारणार
मुंबई (मध्य), मुंबई (पश्चिम), मुंबई (पूर्व), ठाणे (नांदिवली), ठाणे (मर्फी), पनवेल, पेण, पुणे (आळंदी), पुणे (सासवड), पुणे (हडपसर), धुळे, अमरावती, अमरावती (बडनेरा), नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण), नाशिक, नांदेड, लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर, कराड, नागपूर (ग्रामीण) आदी २२ ठिकाणच्या ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक उभारण्यात येणार आहेत.

जागेच्या अभावामुळे घेतला निर्णय मुंबईत जागेचा अभाव असल्याने शाळा, महाविद्यालयाची जागा वाहन प्रशिक्षणासाठी वापरण्याचा विचार आहे. या माध्यमातून शाळा महाविद्यालयांना उत्पन्नही मिळेल.
-अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

Web Title: School grounds for vehicle training?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.