शाळेचे उद्घाटन रखडले

By Admin | Published: July 23, 2014 11:59 PM2014-07-23T23:59:04+5:302014-07-23T23:59:04+5:30

श्रेयवादामुळे सानपाडय़ामधील महापालिकेच्या शाळेचे उद्घाटन पाच वर्षापासून रखडले आहे. आठ वेळा पत्र देऊनही महापौर वेळ देत नाहीत.

School inaugurated | शाळेचे उद्घाटन रखडले

शाळेचे उद्घाटन रखडले

googlenewsNext
नवी मुंबई : श्रेयवादामुळे सानपाडय़ामधील महापालिकेच्या शाळेचे उद्घाटन पाच वर्षापासून रखडले आहे. आठ वेळा पत्र देऊनही महापौर वेळ देत नाहीत. सेना नेत्यांची उपस्थिती टाळण्यासाठी उद्घाटन होऊ दिले जात नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेने सानपाडय़ामधील शाळा क्रमांक 18 व 19 ची जुनी इमारत पाडून नवीन दोन मजली इमारत बांधली आहे. श्री दत्तविद्यामंदिर नावाने ही शाळा ओळखली जात असून 2क्क्9 ला बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी शाळा सुरू केली असून अद्याप तिचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. तत्कालीन नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी उद्घाटनासाठी महापौर व पालकमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांना बोलावले होते. परंतु सेना नेत्यांची उपस्थिती खटकल्यामुळे महापौरांनी उद्घाटनासाठी वेळच दिलेली नाही. यानंतर विद्यमान नगरसेविका कोमल वास्कर यांनीही पत्रव्यवहार केला आहे.परंतु महापौरांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
शाळेच्या उद्घाटनासाठी डिसेंबर 2क्1क् पासून आतार्पयत 8 वेळा पत्र दिले आहे. परंतु अद्याप उद्घाटन होवू शकले नाही. महापालिका कार्यक्षेत्रमधील कोणत्याही उद्घाटनाचा व भूमिपूजनाचा हक्क महापौरांचा असतो. सर्व कार्यक्रमांना पालकमंत्री गणोश नाईक, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार असतात. राजशिष्टाचाराप्रमाणो या आमंत्रितांना आमचा विरोध नाही. परंतु आम्ही ज्या पक्षात काम करतो तेथील आमदार व खासदारांना आम्ही कार्यक्रमास बोलावले तर त्यात गैर काय, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.  सत्ताधा:यांच्या संकुचित दृष्टीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.  (प्रतिनिधी)
 
राष्ट्रवादीची 
संकुचित दृष्टी
उद्घाटनासाठी पालकमंत्री, महापौर असणारच आहेत. परंतु आमच्या नेत्यांच्या उपस्थितीला आक्षेप घेऊन सत्ताधारी संकुचित दृष्टीने वागत आहेत. सात वेळा पत्र पाठवूनही वेळ दिला जात नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संकुचित दृष्टिकोन सोडला नाही तर आम्हाला परस्पर उद्घाटन करावे लागेल अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळ सदस्य व माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी दिली आहे. 
 
शाळा उद्घाटनासाठीच्या पत्रव्यवहाराचा तपशील 
डिसेंबर 2क्1क्, जानेवारी 2क्11, मार्च 2क्11, जून 2क्11, 
जानेवारी 2क्12, जुलै  2क्12, 
जुलै 2क्13, जानेवारी 2क्14 
 
सानपाडय़ामध्ये 2क्1क् मध्ये ग्रामपंचायतकालीन कार्यालयाच्या जागेवर समाज मंदिर बांधण्यात आले आहे. अद्याप त्याचेही उद्घाटन करण्यात आलेले नाही. सदर वास्तूही धूळखात पडून असून यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीचा तत्काळ जनहितासाठी वापर सुरू करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

 

Web Title: School inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.