Join us

काला घोडा फेस्टिव्हलमध्ये तरुणाईसाठी आकर्षक ठरले स्कूल अ जॉय राईड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 3:43 PM

शाळेतून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. ३६ % विद्यार्थी हे इयत्ता ८ वी मध्ये येईपर्यंत शाळेतून ड्रॉप आऊट होतात.

मुंबई - काला घोडा फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे इन्स्टॉलेशन आपल्याला बघायला मिळतात पण गेली १७ वर्ष तंबाखू नियंत्रणासाठी काम करणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशन कला अकादमीच्या क्रिएटिव्ह आर्ट च्या विद्यार्थ्यांनी डॉट या संकल्पनेला धरून स्कूल अ जॉय राईड असे एक इन्स्टॉललेशन बनवले आहे. हे इन्स्टॉलेशन डॉट या संकल्पनेला धरून तयार केलेले असून आर्टिस्ट लोकांसाठी व बघायला येणाऱ्या प्रत्येक तरुण वर्गासाठी ते आकर्षणाचा भाग बनला आहे.

शाळेतून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. ३६ % विद्यार्थी हे इयत्ता ८ वी मध्ये येईपर्यंत शाळेतून ड्रॉप आऊट होतात. ड्रॉप आऊट होण्याची अनेक कारणे आहेत जसे की, अभ्यासाचा ताण, घराची/कुटूंबाची जबाबदारी ,गरिबी इ. या गोष्टींचे भान ठेवून सलाम बॉम्बे फाऊंडेशन कडून शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात हे उपक्रम राबवण्याचा हेतू विद्यार्थ्यांना ताण-तणावापासून दूर ठेऊन आपल्या करिअरची योग्य दिशा ठरवण्यासाठी सक्षम करणे. त्याचबरोबर स्पोर्ट्स अकादमी,मीडिया अकादमी, व्होकेशनल स्किल्स अश्या विविध अकादमी सुद्धा चालवल्या जातात . आपल्या अभ्यासासोबत आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यांचा विकास करून विद्यार्थी जीवनात पुढे जावे याकरीता सलाम बॉम्बे फाऊंडेशन नेहमी प्रयत्नशील असते.

अ स्कूल जॉय राईड मध्ये ओल्ड फॅशन मेरी गो राउंड चा मनोरा रचून जीवनाचा आनंद घेऊन आनंदाने आपल्या जीवनाचे वर्तुळ पूर्ण करावे असे सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करण्यात आला आहे. जीवनात डॉट सारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत याचा आपल्या जीवनात आनंद आणावा. असे एकंदरीत इन्स्टॉलेशनच्या  स्कूल अ जॉय राईड मध्ये दाखवण्याचा मानस कला अकादमीच्या क्रिएटिव्ह आर्ट च्या विद्यार्थ्यांनी केला आहे.