पनवेल, नवी मुंबईत स्कूलबस महागणार..!

By Admin | Published: March 17, 2015 10:55 PM2015-03-17T22:55:32+5:302015-03-17T22:55:32+5:30

सायन - पनवेल महामार्गावरील खारघर - कामोठे टोलनाक्यातून स्थानिक वाहनांना वगळण्यात आले असले तरी व्यावसायिक वाहतूकदारांना यात सवलत न दिल्याने स्कूलबसचेही शुल्क वाढणार आहे.

School in Panvel, Navi Mumbai will be expensive ..! | पनवेल, नवी मुंबईत स्कूलबस महागणार..!

पनवेल, नवी मुंबईत स्कूलबस महागणार..!

googlenewsNext

अरुणकुमार मेहेत्रे ल्ल कळंबोली
सायन - पनवेल महामार्गावरील खारघर - कामोठे टोलनाक्यातून स्थानिक वाहनांना वगळण्यात आले असले तरी व्यावसायिक वाहतूकदारांना यात सवलत न दिल्याने स्कूलबसचेही शुल्क वाढणार आहे. याचा फटका कळंबोली, कामोठे, रोडपाली, पनवेल येथील रहिवाशांना बसणार आहे.
खारघर-कामोठे टोलनाक्यातून स्थानिक स्कूलबस व्यावसायिकांनाही टोलमाफी मिळावी, यासाठी खारघर टोलनाक्यावर वाहतूकदारांनी राज्य सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. हे उपोषण १८ मार्चला करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूकदारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेतल्याचे जाधव यांनी लोकमतशी बोलताना म्हणाले. स्थानिक संघटनेच्या माध्यमातून वारंवार टोलमाफीसाठी संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केला, तर फेब्रुवारी महिन्यात स्थानिक आमदारांची संबंधित अधिकाऱ्यांससमवेत बैठकही झाली. यात नावांच्या याद्या जमा करण्याची सूचना होती. या याद्या देऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी याबाबत कुठलीच दखल न घेतल्याने वाहतूकदारांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
प्रत्येकवर्षी वाढत्या महागाईचा मुद्दा पुढे करत स्कूलबसच्या भाड्यात प्रति विद्यार्थ्यामागे ५० रुपयांची वाढ केली जाते. आता खारघर-कामोठे टोलनाक्यामुळे बस भाड्यात विद्यार्थ्यामागे १०० रुपयांची वाढ होणार आहे. पालकांना टोल आणि वार्षिक वाढ मिळून १५० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल. अण्णा हजारे यांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात हरिश भेकाडे, रवींद्र जाधव, पांडुरंग हुमने, बाळासाहेब आव्हाड, दयानिधी पांडे, मीननाथ खेडकर, शिवाजी देशमुख यांचा समावेश आहे.

आमच्या शाळेत कळंबोली, कामोठे, पनवेल येथील विद्यार्थी आहेत. टोलनाक्यामुळे मुले लवकर येऊनही उशिरानेच पोहोचतात. टोलमधून स्थानिक वाहनांना सूट दिली तशीच स्कूल व्हॅननाही सवलत मिळावी, जेणेकरून पालकांना पैशात मुभा मिळेल.
- वीणा तंपी, प्राचार्य, हार्मोनी पब्लिक स्कूल, खारघर

आमच्याकडून स्कूल व्हॅनवाले ५० रु पये वाढवून घेतात. यंदा टोलमुळे १५० रुपये वाढवले आहेत. मात्र स्थानिकांना टोलसुट आहे.
- सागर जाधव, पालक

टोलनाक्यामुळे १०० रुपयांचा जास्तीचा भार पडला आहे. व्हॅनवाल्यांनीही शुल्क वाढवले आहे.
- रामभाऊ मिसाळ, पालक, कामोठे.

विद्यार्थ्यांमागे स्कूलबसचे भाडे (रु .)
मार्ग जुने दर प्रस्तावित दर
रोडपाली ते खारघर ७५० ९००
कामोठे ते खारघर १०००११५०
पनवेल ते खारघर १२०० १३५०

Web Title: School in Panvel, Navi Mumbai will be expensive ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.