School: रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागणार, शाळांना २ मे पासून सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:14 PM2023-04-19T14:14:17+5:302023-04-19T14:14:29+5:30

Mumbai: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मे ते २६ जून दरम्यान सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये बाहेरगावी जाण्याची तिकिटे काढलेल्या पालकांची अडचण होणार आहे.

School: Railway tickets will have to be cancelled, school holidays from May 2 | School: रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागणार, शाळांना २ मे पासून सुट्ट्या

School: रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागणार, शाळांना २ मे पासून सुट्ट्या

googlenewsNext

मुंबई :  प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मे ते २६ जून दरम्यान सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये बाहेरगावी जाण्याची तिकिटे काढलेल्या पालकांची अडचण होणार आहे. पहिली ते नववी आणि अकरावीच्या सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपल्या आहेत. या सर्व परीक्षांचे मूल्यमापन करून १ मे रोजी प्रगतीपत्रके दिली जातील. त्यामुळे बाहेरगावी जाण्याच्या तयारीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

कोरोना काळातील दोन वर्षांत बहुतांश शाळांचे प्रत्यक्ष कामकाज बंदच होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते. ते भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याची मागणी होत होती. या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणीही होती.

शाळांना २ मे पासून सुट्ट्या 
 कोरोना काळातील नुकसान भरून काढणार कोरोनात शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. 
 एप्रिलमध्ये शाळा सुरू राहणार असल्याने पालकांना एसटी, रेल्वेचे आरक्षण रद्द करावे लागणार आहे. मे महिन्यात नियोजन करावे लागेल.

 

Web Title: School: Railway tickets will have to be cancelled, school holidays from May 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.