Join us  

कचरावेचक मुलांची शाळा

By admin | Published: November 12, 2015 12:30 AM

रस्त्यावरील कचरा वेचणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी मीरा रोडमधील यास्मिन हुसेन या गृहिणीने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे.

राजू काळे, भार्इंदररस्त्यावरील कचरा वेचणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी मीरा रोडमधील यास्मिन हुसेन या गृहिणीने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे.काही महिन्यांपूर्वी यास्मिन यांनी परिसरातीलच चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा मानस सांगितला होता. त्याला त्वरित होकार देत या पाच जणांनी परिसरात कचरा वेचणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना शोधून काढले. तर, शाळेसाठी परिसरातीलच फूटपाथ निवडून तेथे आठवड्यातून सहा दिवस दुपारी २ ते ४ पर्यंत शाळा भरविण्यास सुरुवात केली. सध्या या शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये काही कुपोषित मुले असून त्यांना दररोज चांगले अन्न दिले जाते. तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी हे शिक्षकच खर्च करत असल्याचे अकील विजायन या विद्यार्थ्याने सांगितले. या शाळेत शिकणाऱ्या मुलांना शहरातील शाळांत अधिकृत प्रवेश मिळावा, अशी माफक अपेक्षा यास्मिन यांनी व्यक्त केली आहे. याबाबत, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी सांगितले की, या मुलांना शाळांत मोफत प्रवेश देण्यासाठी संपर्क साधल्यास त्यांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत शिक्षण देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.