Join us

विकृत दुचाकीस्वार करतोय तरुणींसह शाळकरी मुलींना अश्लील स्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 3:09 AM

ऐन परीक्षेच्या काळात रस्त्यावरून एकट्या किंवा वृद्धांसोबत निघालेल्या कॉलेज, शाळा तसेच नोकरदार तरुणींना हेरून विकृत दुचाकीस्वार तरुणांकडून अश्लील स्पर्श होत असल्याच्या घटनेने मुलुंडसह ठाण्यात खळबळ उडाली आहे.

- मनीषा म्हात्रेमुंबई : ऐन परीक्षेच्या काळात रस्त्यावरून एकट्या किंवा वृद्धांसोबत निघालेल्या कॉलेज, शाळा तसेच नोकरदार तरुणींना हेरून विकृत दुचाकीस्वार तरुणांकडून अश्लील स्पर्श होत असल्याच्या घटनेने मुलुंडसह ठाण्यात खळबळ उडाली आहे. यात नवघर पोलीस ठाण्यासह ठाणे पोलिसांनीही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुलुंडच्या म्हाडामध्ये अशा स्वरूपाची पाचपेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत.गेल्या महिनाभरापासून या प्रकाराने जोर धरला आहे. २ जानेवारी रोजी म्हाडा कॉलनीतील १३ वर्षीय नेहा (नावात बदल) आजीसोबत घरी परतत होती. त्याच दरम्यान हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वार तरुणाने, आजी पुढे गेल्याचे पाहून तरुणीला अश्लील स्पर्श करत पळ काढला. मुलगी ओरडताच, आजी त्याच्यामागे धावल्या. आरडाओरड करत त्यांनी पोलीस ठाणे गाठले.या प्रकारानंतर नेहासारखी आणखी ४ ते ५ प्रकरणे समोर आली. त्यात शाळकरी, कॉलेज तसेच नोकरदार तरुणींचा समावेश होता. त्या मुलींनाही दुचाकीस्वाराने तशाच पद्धतीने अश्लील स्पर्श केले होते. स्थानिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दुचाकीस्वाराचा हेल्मेटमधील फोटोही पोलिसांना दिला आहे. मात्र महिना उलटत आला तरी काही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. त्यात पोलीस ठाण्याच्या खेपा, वैद्यकीय चाचणीची भीती यामुळे मुली पुढे येण्यास घाबरत असल्याचेही तक्रारदार आजीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दोन दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत असाच प्रकार घडल्याने, तिने नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.कोपरीमध्येदेखील तरुणीसोबत असाच प्रकार घडला. तेथेही दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याची ओळख पटण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कपड्यांवरून तो शिक्षित असल्याचे समजते. विकृतीतून तो हा प्रकार करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावीदुचाकीस्वाराविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा कसून तपास घेण्यात येत आहे. ज्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे तो दुचाकीस्वार लवकरच पोलीस कोठडीत असेल. नागरिकांची या संदर्भात तक्रार असल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलीस ठाणे गाठून तक्रार द्यावी. सदर परिसरातही गस्त वाढविण्यात येत आहे.- पुरुषोत्तम सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे

टॅग्स :गुन्हेगारी