मुंबई मनपा हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेही निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 10:50 PM2024-07-08T22:50:05+5:302024-07-08T22:50:30+5:30
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, आपत्कालीन परिस्थितीत मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा असे आयुक्तांचे आवाहन
Mumbai BMC School closed: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवार, ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश देण्यात आले असून आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
⛈️🚨The India Meteorological Department (IMD) has issued a Red Alert for Mumbai.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
🏫In view of this, all schools and colleges in Mumbai have been declared a holiday for tomorrow Tuesday, 9th July 2024, in consideration of the safety of students.
The Brihanmumbai Municipal…
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
🏫या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
आवश्यकता असेल तरच…
दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा.
🚨भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
The India Meteorological Department (IMD) has issued a 'Red Alert' for Mumbai.
🛑मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
Mumbaikars, if not required, avoid stepping out of home.… pic.twitter.com/Q7gpqUYQM1— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
भारतीय हवामान खात्याने मुंबईत (दिनांक ८ जुलै २०२४) अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे. मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.