शाळा सुरू होताहेत, आता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

By बाळकृष्ण परब | Published: January 16, 2021 08:24 PM2021-01-16T20:24:20+5:302021-01-16T20:38:41+5:30

SSC, HSC Exam Update : आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतही महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Schools in the state are being started in phases, now the important information given by the Minister of Education about the 10th and 12th examinations | शाळा सुरू होताहेत, आता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

शाळा सुरू होताहेत, आता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

Next

मुंबई - गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात धुमाळूक घालत असलेला कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. तसेच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर भागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळापूर्वी सुरू झाले होते. तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतही महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत निश्चित असा निर्णय लवकरच घेतला जाईल.

दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने काल केली होती. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबई महानगपालिका क्षेत्रातील मात्र पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: Schools in the state are being started in phases, now the important information given by the Minister of Education about the 10th and 12th examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.