९ वी १२ पर्यंतच्या शाळा सुरू होणार; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 02:53 AM2020-11-08T02:53:20+5:302020-11-08T06:54:29+5:30
शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी यांसारख्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, आदी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार केली आहेत ती बंद करता येणार नाहीत. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी यांसारख्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.