Join us

विज्ञान एकांकिका स्पर्धा

By admin | Published: August 24, 2015 1:01 AM

मराठी विज्ञान परिषदेच्या ५० वर्षांनिमित्ताने ‘वैज्ञानिक आणि शोध’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेच्या ५० वर्षांनिमित्ताने ‘वैज्ञानिक आणि शोध’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान विषय मनोरंजनातून समाजापर्यंत पोहोचवणे हा त्यामागील उद्देश आहे. वैज्ञानिक आणि शोध ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे. वैज्ञानिक आणि शोध यात शास्त्रीय शोधाच्या जन्मकथांवर आधारित एकांकिकांचा समावेश असावा. ८ ते ११ जानेवारी २०१६ ह्या चार दिवसांत परिषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन मुंबईत संपन्न होणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्राथमिक फेरी विभाग पातळीवर मुंबई, सांगली, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथे होईल. जानेवारी २०१६मध्ये मुंबई येथे होणाऱ्या ५०व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात मान्यवरांसमोर प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला सादरीकरणाची संधी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व) मुंबई - ४०० ०२२ या पत्त्यावर संपर्क साधावा.