विज्ञान, अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर, १० हजार विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:54 AM2019-02-20T06:54:18+5:302019-02-20T06:54:45+5:30
१० हजार विद्यार्थी उत्तीर्ण : आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने लावले १७२ परीक्षांचे निकाल
मुंबई : मुंबईविद्यापीठाने सोमवारी रात्री नोव्हेंबर / डिसेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र व ह्युमन सायन्स सत्र ५ हे विज्ञान शाखेचे दोन व बीई संगणक अभियांत्रिकी व बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र ७ या अभियांत्रिकीचे शाखेचे दोन असे एकूण चार परीक्षांचे निकाल जाहीर केले. या चार परीक्षांत मिळून १० हजार ००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आतापर्यंत विद्यापीठाने १७२ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.
चारही परीक्षेत मिळून १२ हजार १६८ विद्यार्थी बसले होते. यातील तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र सत्र ५च्या परीक्षेत ३,३८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ३,३७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यातील २,३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ७१.९६ % एवढी आहे. बीई संगणक अभियांत्रिकी सत्र ७च्या परीक्षेत ५,५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५,५१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ५,१२३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९३.४२ % एवढी आहे. बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र ७च्या परीक्षेत ३,३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ३,२५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यातील २,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ७८.१२ % एवढी आहे.