सायन्स एक्सप्रेस मुंबईत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:28 PM2017-07-19T12:28:20+5:302017-07-19T12:29:27+5:30

देशभरात धावणारी विज्ञान प्रदर्शनीय सायन्स एक्स्प्रेस आज मुंबईत दाखल झाली आहे.

Science Express filed in Mumbai | सायन्स एक्सप्रेस मुंबईत दाखल

सायन्स एक्सप्रेस मुंबईत दाखल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19-  देशभरात धावणारी विज्ञान प्रदर्शनीय सायन्स एक्स्प्रेस आज मुंबईत दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक 10 वर ही एक्स्प्रेस उभी आहे. विज्ञानविषयक रंजक गोष्टींचा वेध घेणारे प्रयोग, हवामानातील बदल अशा विविध गोष्टींचा उलगडा सायन्स एक्स्प्रेसच्या बोगीतून दाखवण्यात आला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 5 ते 6 शाळेतील हजारो शेकडो विद्यार्थ्यांनी या एक्स्प्रेसला भेट दिली आहे. विज्ञान विषयाबाबत आकर्षण  निर्माण करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाच्या वतीने हा एक्सप्रेस प्रयोग करण्यात आला आहे. 

19 ते 22 जुलै या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सायन्स एक्सप्रेस असणार आहे. या एक्सप्रेसमध्ये विनामूल्य विज्ञानाची सफर विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यावेळीच्या वैज्ञानिक सफरीचा विषय हवामान बदलामुळे निर्माण झालेली वैश्विक आव्हान असा आहे. 16 डब्यांच्या या रेल्वेमध्ये विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी खास उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

 सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (डीएसटी) विशेष प्रकल्प आहे. ही १६ डब्यांची वातानुकूलित प्रदर्शनी ट्रेन आॅक्टोबर २00७ पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत १ लाख ५६ हजार किमीचा प्रवास पूर्ण करणा-या या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पूर्ण केला आहे.

 

देशभरातील ५१0 स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदवली आहे. आत्तापर्यंतच्या १७५0 प्रदर्शन दिवसांमध्ये या प्रदर्शनास अतिप्रचंड असा १.७0 करोड दर्शकांचा प्रतिसाद लाभल्याने सायन्स एक्सप्रेस हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन बनले असून त्यासाठी तब्बल १२ वेळा लीमका बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विज्ञानाच्या राणीची दाखल घेतली गेली.

 

सायन्स एक्सप्रेसने आपल्या पहिल्या चार पर्वामध्ये जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली भारतातील समृध्द जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन त्या पुढील तीन पर्वामध्ये सायन्स एक्सप्रेस जैवविविधता विशेष या नावाने प्रदर्शित झाले.

 

सायन्स एक्सप्रेस आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानाना दर्शविणारे होते जे सायन्स एक्सप्रेस जलवायु परिवर्तन विशेष या नावाने प्रदर्शित केले गेले. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे. तसेच प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.scienceexpress.in  या संकेतस्थळावर भेट देता येईल.

 

 

 

Web Title: Science Express filed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.