Join us

माशांची वैज्ञानिक माहिती, संवर्धनासाठी मिळणार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदळवन प्रतिष्ठानतर्फे डॉ. विनय देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. नंदिनी देशमुख लिखित ‘मासे जाणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदळवन प्रतिष्ठानतर्फे डॉ. विनय देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. नंदिनी देशमुख लिखित ‘मासे जाणून घेऊया’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, कांदळवन प्रतिष्ठानच्या सहसंचालक नीनू सोमराज, मुंबई कांदळवन संधारण घटकचे सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मगदूम, पुस्तकाच्या लेखिका डॉ. नंदिनी देशमुख तसेच डॉ. सुशांत चक्रवर्ती, विनोद नाईक, डॉ. अनुलक्ष्मी चेलापन, सदाशिव राजे उपस्थित होते.

कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी या पुस्तकासाठी आवश्यक समन्वय साधला. पुस्तकातील चित्रे, संकल्पन, पुनर्वाचन आणि पुस्तक लेखनात डॉ. नांदिनी देशमुख यांचे सहाय्य केले. कांदळवन प्रतिष्ठानच्या सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बगाडे यांनी छायाचित्रे दिली असून, मजकुराचे पुनर्वाचन करण्यास मदत केली. हे पुस्तक म्हणजे माशांद्वारे देशाला विदेशी चलनाचा ओघ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या पुस्तकात सागरी माशांच्या प्रजातींचे महत्त्व, त्यांची ओळख, इतर महत्त्वाची वैज्ञानिक माहिती तसेच त्यांचा संवर्धनासाठीचे उपायही सांगितले आहेत.