संदीप शिंदे मुंबई : ज्या भागात मेट्रोचे जाळे विस्तारलेले नाही ते भाग रोपवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी एमएमआरडीएने रोपवेचा अभिनव पर्याय स्वीकारला. मात्र, पहिल्या टप्प्यात प्रस्तावित केलेल्या बोरीवली-गोराई आणि मालाड -मार्वे या दोन्ही मार्गिकांना कात्री लावण्यात आली आहे. त्यानंतरही चारकोप ते मार्वे ही मार्गिका तांत्रिकदृष्ट्या सुसाध्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महावीरनगर ते गोराई मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या मार्गिकेची दिशा ठरविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने ९ जुलै, २०१९ रोजी झालेल्या बैठकीत बोरीवली ते गोराई (८ किमी) आणि मालाड ते मार्वे (४.५ किमी) या दोन ठिकाणी रोपवे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मे. इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत सर्वेक्षण केल्यानंतर दोन्ही मार्गिकांचे अंतर कमी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महावीरनगर मेट्रो स्टेशन-पॅगोडा-गोराई (७.२ किमी) आणि चारकोप-मार्वे (३.६ किमी) मार्गावरील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा तयार करण्यात आल्या आहेत.मात्र, पहिल्या टप्प्यात महावीरनगर ते गोराई या मार्गिकेचेच काम पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, हे काम आता डिझाईन, बिल्ट, फायनान्स, आॅपरेट, ट्रान्सफर (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने तयार केला आहे. तसेच, चारकोप ते मार्वे ही मार्गिका तांत्रिक कारणांमुळे सुसाध्य नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महावीरनगर ते गोराई या मार्गिकेचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच दुसºया मार्गिकेबाबत विचार केला जाईल.>अशी आहे महावीरनगर ते गोराई मार्गिकाएकूण लांबी - ७.२ किमीस्थानके - ८प्रवासाचा वेळ - ३६ मिनिटेताशी प्रवासी संख्या - ३०००प्रकल्पाची किंमत - ५६८ कोटी रुपयेसवलत कालावधी - ४० वर्षेदेखरेख खर्च - १४२५ कोटी रुपयेमूळ भाडे - प्रत्येक दोन किमीसाठी १२ रुपयेवार्षिक प्रवासी संख्या - १ लाख ४६ हजारप्रकल्पाचा वित्तीय परतावा - १४.३ टक्के
एमएमआरडीएच्या रोपवेला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 11:51 PM