अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 02:01 PM2023-05-06T14:01:52+5:302023-05-06T14:02:19+5:30

विमानात असलेल्या एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली.

Scorpion stings woman passenger on Air India Nagpur-Mumbai flight, airline calls it 'unfortunate incident' | अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान

अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान

googlenewsNext

मुंबई : तुम्ही विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या अनेकदा ऐकल्या असतील. पण, विमानात प्रवास करताना एखाद्या प्रवाशाला विंचूने दंश केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असाच काहीसा प्रकार नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडला आहे. विमानात असलेल्या एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. 

विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही घटना 23 एप्रिल रोजी घडल्याचे सांगितले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपुरात गेली होती. 

एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई फ्लाइटने (AI 630) ती परत येत होती. नियोजित वेळेत महिला विमानात आपल्या सीटवर बसली. त्यानंतर विमानाचेही उड्डाण सुद्धा ठरलेल्या वेळेत झाले. विमान आकाशात पोहोचताच अचानक या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाइट अटेंडंटने लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली, तेव्हा महिलेला विंचूने दंश केल्याचे समजले. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासीही घाबरले. 

या घटनेनंतर गडबडीत संपूर्ण विमान तपासले, पण विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर होत होती. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावर पोहोचताच महिलेला प्रथम विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी तिला रात्रभर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला. 

दुसरीकडे, एअर इंडियाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. या घटनेला दुजोरा देत कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यामध्ये माहिती मिळताच महिलेसाठी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, मुंबईला पोहोचल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत कंपनीची टीम तिच्यासोबत उपस्थित होती. 

दरम्यान, याआधी गल्फ इंडियाच्या विमानात एक पक्षी कॉकपिटमध्ये घुसला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय विमानवाहू कंपनीच्या कालिकत दुबईच्या फ्लाइटमध्ये साप आढळून आला होता. याशिवाय, प्रवासादरम्यान अनेक विमानात उंदीर दिसले आहेत.

Web Title: Scorpion stings woman passenger on Air India Nagpur-Mumbai flight, airline calls it 'unfortunate incident'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.