Join us

माहीमच्या स्कॉटिश शाळेची बस जळून खाक, गोरेगावच्या नेस्को बिंबिसार कॉलनी जवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:26 PM

 मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या माहीमच्या स्कॉटिश शाळेच्या  बसने अचानक दुपारी साडेबाराच्या दरम्यान पेट घेतला. सुदैवाने या शाळेच्या बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.पश्चिम द्रुतगती महामार्गावर या आगीमुळे अंधेरीकड़े जाणाऱ्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  ही मिनी बस बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या विद्यार्थ्यांना रोज गोरेगाव आरे चेक नाक्याजवळ सोडते.मात्र आज रोजच्या प्रमाणे या शाळेतील तीन मुलांना सोडल्यावर बस पुन्हा माहिम येथे परत जात असताना अचानक बसच्या मागच्या बाजूने धूर येऊ लागल्यावर तत्काळ चालकाने बस थांबवली.तत्काळ बसमधील बस चालक प्रोशनजीत तालुकधर आणि शाळेतील बसमध्ये मुलांना सांभाळणारी मदतनीस महिला यांनी बाहेर धाव घेतली.आणि ते बाहेर पड़ताच काही क्षणातच बसने पेट घेतला. या भीषण घटनेत ही बस पूर्णपणे जळून ख़ाक झालीे.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे.आगीचे कारण अद्याप समजले नसून  शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा या बसला अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईशाळा