भंगार बसेसचं होणार ‘बेस्ट’ सोनं; प्रायोगिक तत्त्वावर ४ बसमध्ये रेस्टाॅरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:49 AM2023-11-23T09:49:59+5:302023-11-23T09:50:50+5:30

प्रायोगिक तत्त्वावर ४ बसमध्ये रेस्टाॅरंट, आर्ट गॅलरी, वाचनालय

Scrap buses will become 'best' gold; Restaurants in 4 buses on pilot basis | भंगार बसेसचं होणार ‘बेस्ट’ सोनं; प्रायोगिक तत्त्वावर ४ बसमध्ये रेस्टाॅरंट

भंगार बसेसचं होणार ‘बेस्ट’ सोनं; प्रायोगिक तत्त्वावर ४ बसमध्ये रेस्टाॅरंट

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : शहरात भटकंती करताना खवय्यांसाठी रेस्टॉरंट, रसिकांसाठी आर्ट गॅलरी, वाचनालय अशा सुविधा मुंबईकरांनाबेस्ट बसमध्ये मिळतील. वय संपलेल्या बेस्टच्या बस भंगारात न काढता त्यांचे आधुनिकीकरण करून त्या रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, व वाचनालयासाठी देण्यात येणार आहेत. 

प्रयोगिक तत्त्वावर ४ बसेसमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून निधी प्राप्त होणार असल्याची माहिती शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. नवीन आणि होतकरू तरुणांना आर्ट गॅलरीत संधी मिळत नाही. भाडे ही परवडत नाही. त्यामुळे आपल्या कलागुणांना संधी देण्यासाठी यांना चांगली जागा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 

फॅशन स्ट्रीटचा आराखडा अंतिम 
मुंबईत आता सर्वत्र विविध प्रकारच्या कपड्यांची खरेदी करता येत असली तरी फॅशन स्ट्रीटला खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  मात्र गेल्या काही वर्षात या फॅशन स्ट्रीटला बकाल स्वरूप आले आहे. मात्र लवकरच याचा कायापालट करण्यात येणार असून पुढच्या आठवड्यात यासाठीच्या विकास नियोजनाला अंतिम स्वरूप प्राप्त होईल, अशी महिती केसरकर यांनी दिली.

खरेदीदारांसाठी वारसा जपत सोई-सुविधा
फॅशन स्ट्रीट येथील परिसराचा पुरातन वारसा जपत खरेदीदारांसाठी सोयी-सुविधा देता याव्यात याकरीता मुंबई महापालिकेने या कामासाठी सल्लागारही नेमले आहेत. क्रॉस मैदान झाकले जाणार नाही, अशा पद्धतीने येथील दुकानांची रचना करण्यात येणार आहे.
फॅशनस्ट्रीटच्या मागच्या बाजूला असलेले क्रॉस मैदान दुकानदारांनी लावलेल्या कपड्यांमुळे झाकले गेले आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटमधील दुकानांची सुनियोजित पद्धतीने मांडणी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Scrap buses will become 'best' gold; Restaurants in 4 buses on pilot basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.