Join us

निधीअभावी काटकसरीची कात्री

By admin | Published: January 14, 2017 6:31 AM

नोटाबंदीनंतरही न सावरलेली परिस्थिती आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचा फटका बसल्याने साहित्य

डोंबिवली : नोटाबंदीनंतरही न सावरलेली परिस्थिती आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचा फटका बसल्याने साहित्य संमेलनाच्या निधीची गंगा आटली आहे. त्यामुळे महामंडळाने आधी दिलेला काटकसरीचा आदेश पाळत खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.नोटबंदी व निवडणूक आचारसंहितेचा फटका संमेलनाच्या निधीला बसल्याचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी मान्य केले. असे असले तरी संमेलनाची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे असेही त्यांनी सांगितले.या संमेलनासाठी किमान पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अवघे २० दिवस हाती असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात निधी गोळा होणार की नाही याविषयी साशंकता आहे. विविध लोकप्रतिनिधी, संस्था, आमदार, खासदार, वेगवेगळ््या महापालिका-नगरपालिका, आगरी समाजातील उद्योजक, बिल्डर निधी देणार असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठीचा पत्रव्यवहार आयोजक आगरी यूथ फोरमने केला होता. साहित्य संमेलनास सरकारतर्फे २५ लाखांचा निधी दिला जातो. तो आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा ५० लाखांचा निधी मिळणार आहे. त्यापैकी २५ लाखांचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आगरी यूथ फोरमला दिला गेला. उर्वरित २५ लाखांचा निधी आचारसंहितेमुळे मिळणार की नाही असा मुद्दा होता. मात्र निवडणूक आयोगानेच त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (प्रतिनिधी)