समुद्र खवळला; मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:18 AM2018-11-18T02:18:47+5:302018-11-18T02:18:59+5:30
वातावरणीय बदलातील स्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्र, गोवा आणि त्या पुढील समुद्र किनारी वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेला राहील. वातावरणीय बदलातील स्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
१८ नोव्हेंबर रोजी अरबी समुद्राहून वाहत्या वाऱ्याचा वेग ताशी ७५-८५ किलोमीटर असेल. समुद्र खवळेलला राहील. १९ नोव्हेंबर रोजी वाºयाचा वेग ७० किमी असेल. २० नोव्हेंबर रोजी वाºयाचा वेग ५० असेल. २१ नोव्हेंबर रोजी ४० किमी असेल, शिवाय समुद्र खवळेला राहील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी उतरू नये. दुसरीकडे दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे ११.९ अंश सेल्सिअस आहे. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस ्र्रपडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २१ नोव्हेंबरला राज्यात हवामान कोरडे राहील.
वातावरणात फेरबदलांची नोंद होत असतानाच मुंबईचे किमान तापमान २० अंशावर स्थिर आहे. परिणामी रात्रीच्या वातावरणातील गारवा कायम आहे. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास असल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील पाच दिवस वातावरण असेच राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
गज चक्रीवादळामुळे वातावरणात बदल
बंगालच्या उपसागरात उठलेल्या ‘गज’ वादळानंतर वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहे. ‘गज’ वादळामुळे दक्षिणेत काहूर माजले असतानाच, किनारी प्रदेशासही वेगवान वाºयाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईचे कमाल तापमान मात्र ३५ अंशाच्या आसपासच आहे.