मुंबई : केवळ तिकिटांच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेच्या संचलनाचा डोलारा पेलणे एमएमआरडीएशी संलग्न असलेल्या मुंबई महामेट्रोला अशक्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी कार्यान्वित होणाऱ्या अंधेरी ते दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर ते डीएन नगर (२अ) या मार्गावरील मेट्रो प्रकल्पांसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत उभे केले जाणार आहेत. या स्रोतांच्या माध्यमातून किती आणि कसा महसूल प्राप्त होईल, याची चाचपणी एमएमआरडीए सुरू करणार असल्याची माहिती हाती आली आहे.मेट्रो रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांसाठी प्रवासी भाडे मर्यादित ठेवावे लागते. त्यामुळे केवळ तिकीटविक्रीच्या जोरावर ही वाहतूक सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे धोरणाचा स्वीकार करताना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची मुभा प्राधिकरणांना दिलेली आहे. तसेच, राज्य सरकारने १७ आॅक्टोबर, २०१५ रोजी शासन निर्णयाद्वारे तशी परवानगी एमएमआरडीएला दिली आहे.वसोर्वा, अंधेरी, दहिसर या मार्गावरीलमेट्रो २०१४ सालापासून सुरू झालीअसून, डिसेंबर, २०२०पर्यंतअंधेरी-दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर-डीएन नगर (२ अ) या मार्गावर मेट्रो धावेल असा अंदाज होता. मात्र, कोरोनामुळे तो मुहूर्त लांबणीवर पडला आहे. मात्र, या दोन मार्गांवर अन्य स्रोतांच्या माध्यमातून महसूल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाला असून त्यासाठी एमएमआरडीए लवकरच सल्लागार नियुक्त करणार आहे.जाहिराती, मेट्रो स्टेशन आणि मार्गिकांवरील जागांचा व्यावसायिक वापर, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), डिजिटल मार्केटिंग अशा विविध आघाड्यांवर पर्ययी स्रोत शोधण्याची परवानगी आहे. त्यानुसार मेट्रोचे कोच, अंतर्गत व्यवस्था, स्टेशन आणि त्याभोवतालच्या परिसरातील जाहिरातींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळू शकेल, त्या भागामध्ये टेलिकॉम टॉवर्स उभारणी आणि आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे विस्तारणे शक्य आहे का, एटीएम किंवा छोट्या व्यावसायिक अस्थापनांना जागा भाडेतत्त्वावर देणे शक्य होईल का, अशा विविध आघाड्यांवर हे सल्लागार आपला सहा महिन्यांत अहवाल तयार करतील.त्यानंतर या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठीसुद्धा त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या मार्गिकांवरील पर्याय स्रोतांच्या माध्यमातून नेमके किती उत्पन्न मिळेल हे सल्लागारांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळू शकेल, अशी माहिती एमएमआरडीएतल्या अधिकाऱ्यांनी दिली.>कोरोनामुळे हुकला मुहूर्तराज्य सरकारने १७ आॅक्टोबर, २०१५ रोजी शासन निर्णयाद्वारे तशी परवानगी एमएमआरडीएला दिली आहे. वर्सोवा, अंधेरी, दहिसर या मार्गावरील मेट्रो २०१४ सालापासून सुरू झाली असून, डिसेंबर, २०२०पर्यंत अंधेरी-दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर-डीएन नगर (२ अ) या मार्गावर मेट्रो धावेल असा अंदाज होता. मात्र, कोरोनामुळे तो मुहूर्त लांबणीवर पडला आहे़ मात्र या दोन मार्गावर अन्य स्रोतांच्या माध्यमातून महसुलासाठी प्रयत्न आहे़
मेट्रोसाठी पर्यायी उत्पन्न स्रोतांचा शोध, मेट्रो दोन, सातसाठी चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 2:38 AM