Join us

कांजूरमार्गऐवजी अन्य पर्यायांचा शोध सुरू - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 1:43 AM

Eknath Shinde : केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची चाचपणी केली जात आहे.

मुंबई : मेट्रो कारशेड लवकर होणे गरजेचे आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पर्यायी जागांचा शोध सुरू आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल, असेही ते म्हणाले.केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची चाचपणी केली जात आहे. कांजूरमार्गची ४० हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो ३,४ आणि ६ या लाइन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाइनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाइन नेणे शक्य होणार आहे, असे शिंदे म्हणाले. कांजूरमार्गची जागा कागदोपत्री राज्य शासनाचीच आहे असा दावा त्यांनी केला.विधान परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडीने जिंकल्या. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी एक नंबरला असेल. ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीच सर्वाधिक जागा जिंकेल. सगळ्यांनी ती तयारी सुरू केली आहे, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमेट्रो