लिंबाच झाड आणि टाकीवरून घेतला मुलीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:06 AM2021-03-05T04:06:29+5:302021-03-05T04:06:29+5:30
''मला वाचवा म्हणत आलेल्या कॉलमधील मुलीने समोर लिंबाच झाड आणि टाकी असल्याचे सांगून फोन ठेवला. याच तुटपुंज्या माहितीवरून वाकोला ...
''मला वाचवा म्हणत आलेल्या कॉलमधील मुलीने समोर लिंबाच झाड आणि टाकी असल्याचे सांगून फोन ठेवला. याच तुटपुंज्या माहितीवरून वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजना परब यांनी १६ वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका केली. लग्नाचे आमिष दाखवून या मुलीची विक्री करण्यात आली होती.
वाकोला परिसरात पती आणि दोन मुलांसोबत राहणाऱ्या परब या १९९८ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. कस्तुरबा पोलीस ठाण्यात पहिली पोस्टिंग. गेल्या ४ वर्षांपासून वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १ जून २०१९ पासून येथील मिसिंग पथकाची जबाबदारी खांद्यावर पडली.
या दोन वर्षांत त्यांनी २०० अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेतला. नुकतेच गोरखपूरमधून तीन मुलींचा शोध घेत त्यांची कुटुंबीयासोबत भेट घडवून आणली आहे. फेब्रुवारी २०२० ते फेबुवारी २०२१ पर्यंत महिला (७९), पुरुष, (९५), मुली (२५), मुले (५) यांचा शोध घेतला आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास आणखीन आवड निर्माण होते. हरवलेली व्यक्ती आपल्याच घरातील एक असल्याचे समजून शोध सुरू असतो.