मुंबई - शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत २ कोल्हे आले आणि तेच भटक्या कुत्र्यांची शिकार बनले. मुंबईच्या अंधेरी लोखंडवाडवाला भागातील कांदळवनात २ दिवसांपूर्वी मध्य रात्रीच्या वेळेस अचानक १०-१२ कुत्रे दोन प्राण्यावर हल्ला करत होते. हे प्राणी कोल्हे असल्याचे समोर आले. खरंतर कोल्हा एकटाच ३-४ कुत्र्यांचा फडशा पाडतो, पण जंगलात खाद्यच न उरल्याने आधीच अशक्त असलेले कोल्हे शिकारीच्या शोधात शहरी भागात आले आणि ते स्वत:च शिकार झाले. दरम्यान, दोन वन्यजीवांवर कुत्र्यांनी हल्ला केला हे पाहून स्थानिकांनी त्या कोल्ह्यांची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली आणि ठाणे वनपरीक्षेत्र अधिकारी एस एस कंक यांना फोन करुन कोल्ह्यांबाबत माहिती दिली.
शिकारीच्या शोधात कोल्हे घुसले मानवी वस्तीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 8:49 PM