दिपक मोहिते, वसईपालघर जिल्ह्याला थेट डहाणू-झाई पर्यंत सुमारे ११२ चौ. कि. मी. अंतराचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, या समुद्रकिनारी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात राज्याचे गृहखाते आजपर्यंत संवेदनशील राहिलेले नाही. अर्नाळा येथे गेली अनेक वर्षे टेहळणी मनोरा उभा करण्यात आला पण त्या मनोऱ्यात कधीही सुरक्षारक्षक पहावयास मिळाला नाही. कस्टम विभागातर्फे दिवसभरात एक ते दोन फेऱ्या मारण्यात येतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ज्या उपाययोजना व्हायला हव्यात त्या मात्र कधीही झालेल्या नाहीत. समुद्रकिनारी असलेल्या गावांत ग्रामसुरक्षा दले स्थापन झाली परंतु स्वयंसेवकांना मात्र कोणतेच काम मिळालेले नाही. काही वर्षापुर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी हे समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते. या हल्ल्यानंतर केंद्र व राज्य सरकार खडबडून जागे झाले व त्यांनी समुद्रकिनारी विशेष सुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगवान बोटी कस्टम खात्याला दिल्या. परंतु त्यानंतर मात्र सुरक्षा उपाययोजना करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत गेले.
समुद्रकिना-याची सुरक्षाव्यवस्था वा-यावर
By admin | Published: November 18, 2014 11:05 PM