‘बेस्ट’मध्ये सीट बाय सीट, रांगेत प्रवाशांना आला वीट, अनेक स्टॉपवर बस थांबल्याच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 07:26 AM2021-06-08T07:26:51+5:302021-06-08T07:27:15+5:30

Mumbai : निर्बंध शिथिलीकरणानंतर बहुतांश व्यवहार सुरू झाल्याने शनिवारपासून मुंबईतील गर्दी वाढली. अद्याप सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने बेस्ट बसवरील ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतेनेच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Seat-by-seat in ‘Best’, the passengers in the queue got annoyed, the buses did not stop at many stops | ‘बेस्ट’मध्ये सीट बाय सीट, रांगेत प्रवाशांना आला वीट, अनेक स्टॉपवर बस थांबल्याच नाहीत

‘बेस्ट’मध्ये सीट बाय सीट, रांगेत प्रवाशांना आला वीट, अनेक स्टॉपवर बस थांबल्याच नाहीत

Next

मुंबई : मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु सीट फुल झाल्यानंतर प्रवेश दिला जात नसल्याने पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. उभ्याने प्रवासास परवानगी नसल्याने गर्दीच्या वेळी सर्व बसस्थानकांवर लांबलचक रांगा हाेत्या.

निर्बंध शिथिलीकरणानंतर बहुतांश व्यवहार सुरू झाल्याने शनिवारपासून मुंबईतील गर्दी वाढली. अद्याप सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने बेस्ट बसवरील ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतेनेच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने सोमवारी प्रवाशांना बस पकडण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. आसन क्षमता पूर्ण झाली की बस मार्गस्थ होत आणि उर्वरित प्रवासी पुढच्या बसची वाट पाहत तासन् तास ताटकळत उभे राहत, असे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

पहिल्या स्टॉपवरच सीट पूर्ण भरत असल्याने अन्य थांब्यांवरच्या प्रवाशांना न घेताच अनेक बस रवाना झाल्याचे सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत अनेक थांब्यांवर पाहायला मिळाले. त्यामुळे एरवी शुकशुकाट असलेल्या बसस्टॉपवरही सोमवारी मोठी गर्दी दिसून आली. याचा सर्वाधिक फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला. एकही बस उभी राहत नसल्याने 
बऱ्याच जणांना रिक्षा-टॅक्सी किंवा ओला-उबर करून कार्यालय गाठावे लागले.

मास्क नाही, प्रवेश नाही
विनामास्क असलेल्यांना बेस्टने बसमध्ये प्रवेश न देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना सोमवारी खाली उतरविण्यात आले. तसेच गाडी सुरू झाल्यानंतर मास्क हनुवटीखाली ओढल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रवाशांना वाहकांनी नियमांचे पालन करण्यास सांगितले.

ठाणे, पालघरमध्ये बाजारात गर्दी
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी झाली. पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विविध अवजारे तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. नवी मुंबईमध्ये जवळपास दोन महिन्यांनंतर सर्व माॅल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले. रायगडमध्ये कडक निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरातील बाजारपेठेत येणे टाळले.

मुंबईत प्रशासनाची कसरत
मुंबईत जवळपास दीड महिन्यांनी मोकळीक मिळालेल्या नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. या नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले. सकाळपासून ऊन डोक्यावर येईपर्यंत रस्त्यांवर भटकणाऱ्यांचा उत्साह दुपारी २ नंतर मावळला, सायंकाळी पाचनंतर यात पुन्हा भर पडली.

Web Title: Seat-by-seat in ‘Best’, the passengers in the queue got annoyed, the buses did not stop at many stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई