Join us  

‘सैराट’च्या बनावट सीडी जप्त

By admin | Published: May 06, 2016 2:33 AM

अल्पावधीत सुपरहिट ठरलेल्या सैराट या मराठी चित्रपटाच्या बनावट सीडी बनविणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनीही कारवाईचा धडाका लावला आहे. गुरुवारी डी.बी. मार्ग व घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

मुंबई : अल्पावधीत सुपरहिट ठरलेल्या सैराट या मराठी चित्रपटाच्या बनावट सीडी बनविणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनीही कारवाईचा धडाका लावला आहे. गुरुवारी डी.बी. मार्ग व घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात ठिकाणी छापे टाकून ‘सैराट’च्या २३ बनावट सीडी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, ही कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचे उपायुक्त आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण पडवळ यांनी सांगितले.‘सैराट’ची पायरसी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याची तक्रार मंगळवारी सायबर सेलमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून तातडीने वरिष्ठ निरीक्षक परशुराम काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रचून कारवाई करण्यात आली. घाटकोपरमधून पोलिसांनी सुरेद्र घोसाळकर (३४), हाशिम खान (२१), मुस्ताख खान(२३) इब्नेश शहा (३४), शाहबाज खान (२३) व बबलू उर्फ अब्दुल शहा ( २२)६ जणांना पकडून सैराट चित्रपटाच्या २३ बनावट सीडी, चित्रपट अपलोड करण्यासाठी वापरले जाणारे ३ संगणक व इतर चित्रपटांच्या बनावट ७६७५ सीडी जप्त केल्या. त्यांच्यावर एस्सेल व्हिजन कंपनीच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात कॉपी राईट अ‍ॅक्ट कलम ५१, ६३ व ६४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, सहाही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)डी.बी. मार्ग व घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध सात ठिकाणी छापे टाकले. त्या ठिकाणी संगणकावरुन मोबाईलमध्ये ‘सैराट’ची कॉपी अपलोड करुन देण्यात येत होती. बनावट सीडीही दिल्या जात होत्या.