मुंबई: गणेशोत्सवापूर्वी राज्यातील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी केली. गणेश विसर्जनासाठी लाखो लोक समुद्रकिनाऱ्यावर जमा होतात. गेल्या वर्षी महाविद्यालयीन सहलीसाठी गेलेल्या १४ विद्यार्थ्यांचा मुरूड-जंजिºयाच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वरील सूचना केली. ‘गणेशोत्सव नजीक येत असल्याने राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून किनाºयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावी,’ अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली.गिरगाव चौपाटीवर तात्पुरता वॉच टॉवर उभारण्यासाठी एमसीझेडएमकडून परवानगी घेण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले. ‘एमसीझेडएमने महापालिकेच्या प्रस्तावावर १० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा. त्याशिवाय महापालिकेने गिरगाव चौपाटीवर कायमस्वरूपी वॉच टॉवर उभारण्यासाठीही एमसीझेडएमकडे परवानगी मागावी,’ असे निर्देश न्यायालयाने दिले.जीपमधून सतत समुद्रकिनाºयावर गस्त घाला. तुम्ही ‘बेवॉच’ बघितला नाही का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणांचा वापर करा, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १६ आॅक्टोबर रोजी ठेवली.
गणेशोत्सवापूर्वी समुद्रकिनारे सुरक्षित करा - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:13 AM