आमदाराचा लाकडी फळीचा कृत्रिम तलाव कोसळला, लाखो रुपये पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 08:22 AM2020-08-22T08:22:28+5:302020-08-22T09:49:47+5:30

आमदाराच्या हस्ते झाले होते थाटात उदघाटन, पहिलाच प्रयत्न फसला

On the second day of the inauguration, the artificial lake collapsed, costing millions of rupees in bhandup | आमदाराचा लाकडी फळीचा कृत्रिम तलाव कोसळला, लाखो रुपये पाण्यात

आमदाराचा लाकडी फळीचा कृत्रिम तलाव कोसळला, लाखो रुपये पाण्यात

Next
ठळक मुद्देमुंबईत पालिकेकड़ून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहे. त्यापैकी भांडुपमधील १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप कुठलेच काम पूर्ण झालेले नाही

मनीषा म्हात्रे 

मुंबई : भांडुपमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत पहिल्यांदाज लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगून आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फुटला. मात्र, उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. 
       
मुंबईत पालिकेकड़ून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहे. त्यापैकी भांडुपमधील १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप कुठलेच काम पूर्ण झालेले नाही. त्यातही कोरगावकर यांनी भांडुपचे सेंटर पॉइंट असलेल्या लालाशेठ कम्पाउंड येथे डांबरी रस्त्यावर, मुंबईत प्रथमच लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्याचा घाट घातला. थाटात १८ ऑगस्ट रोजी याचा भूमिपूजनाचा शुभारंभही पार पडला. सोशल मिडियावर फोटोही शेअर करण्यात आले. गुरूवारी याचे काम पूर्ण झाले. त्यात शुक्रवारी दुपारीच हा कृत्रिम तलाव कोसळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. हे तलाव केन्द्रस्थानी असल्याने ६० टक्के भांडुपकरांना याचा  फ़ायदा होणार होता. विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी हानी झाली असती. 

स्थानिक पदाधिकारीकडेच कामाचा ठेका...
यात सेनेच्या स्थानिक पदाधिकारीकडून या कामाचे कंत्राट घेण्यात आले होते. यासाठी चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

एस वॉर्डला वालीच नाही... 
पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्ताची दोन दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. त्यात नवीन अधिकाऱ्याने अद्याप पदभार स्विकारलेला नाही. त्यामुळे सदयस्थितीत एस वॉर्डला वालीच नाही आहे. यावर प्रशासन क़ाय भूमिका घेणार? हा प्रश्न भांडुपकर उपस्थित करत आहेत.

लाकड़ी साहित्याच्या नादात आधार विसरले...
तलाव तयार करताना खोल खड्डा खणणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याला आधार मिळाला असता. मात्र, यात डांबरी रस्त्यावर खोदकाम करणे शक्य नाही. त्यात वरच्यावर काम केल्यामुळे हा कोसळला. विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असे माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सांगितले. 

आमदारांकड़ून प्रतिसाद नाही..
याबाबत शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही.


 

Web Title: On the second day of the inauguration, the artificial lake collapsed, costing millions of rupees in bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.