दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:23 PM2019-10-15T17:23:57+5:302019-10-15T17:53:45+5:30

एकाच दिवसात पीएमसीच्या दोन खातेदारांचा मृत्यू

Second Death in 24 Hours Another PMC Bank Account Holder Dies due to Heart Attack | दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई: पीएमसी बँक आर्थिक अडचणीत आल्यानं ग्राहकांचं होत असलेले हालच सुरूच आहेत. पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या फत्तोमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या धक्कानं मृत्यू झाला. मुलुंडचे रहिवासी असलेल्या पंजाबी यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मुलुंड कॉलनीमधील जवळपास 95 टक्के लोकांची पीएमसी बँकेत खाती आहेत. 

याआधी ओशिवरामधील 51 वर्षीय संजय गुलाटींचा हृदयक्रिया बंद पडल्यानं मृत्यू झाला. पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधांविरोधात काल ठेवीदारांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर घरी परतलेल्या गुलाटींचा हृदयक्रिया बंद पडल्यानं मृत्यू झाला. त्यांचे तब्बल 90 लाख रुपये पीएमसी बँकेतील खात्यामध्ये अडकले होते. 

संजय गुलाटी त्यांचे वडील सी. एल. गुलाटी, आई वर्षा गुलाटी आणि पत्नी बिंदू गुलाटी यांच्यासह ओशिवरामधील तारापोरवाला गार्डनजवळ वास्तव्यास होते. संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये इंजिनियर होते. मात्र काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांची पीएमसी बँकेत चार खाती होती. मात्र पीएमसी बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादल्यानं त्यांचे सुमारे 90 लाख रुपये अडकले. यामुळे ते अतिशय चिंतेत होते. आरबीआयनं लादलेल्या निर्बंधांविरोधात बँकेच्या ठेवीदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात त्यांनी सहभागी घेतला होता. हे आंदोलन आटोपून घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. दरम्यान काल आरबीआयने पीएमसी बँकेमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकानुसार, पीएमसीचे ग्राहक ४० हजार रुपये काढू शकतात. सध्या ही मर्यादा २५ हजार रुपये आहे. 
 

Web Title: Second Death in 24 Hours Another PMC Bank Account Holder Dies due to Heart Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.