सेकंड लीड ःः रुग्णालय, कोविड सेंटरमधील ७५ टक्के खाटा रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:27+5:302021-01-08T04:13:27+5:30
मुंबई : महापालिकेच्या कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
मुंबई : महापालिकेच्या कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील खाटा आता मोठ्या प्रमाणात रिकाम्या झाल्या आहेत. सध्या मुंबईत केवळ ७७७१ सक्रिय रुग्ण असल्याने ७५ टक्के खाटा रिकाम्या झाल्या आहेत.
सप्टेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिकेचे वैद्यकीय पथक मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी करीत होते. महिनाभरात या मोहिमेने आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.२१ टक्के एवढा खाली आला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीदेखील आता ३५७ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या सक्रिय ७७७१ रुग्णांपैकी चार हजार ९०४ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तर दोन हजार ४५८ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. ४०९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत महापालिकेने २४ लाख चार हजार १ चाचण्या केल्या आहेत.
अशी आहेत सद्यस्थिती
प्रकार उपलब्ध खाटा... दाखल रुग्ण... रिक्त
एकूण खाटा १३८९८ ... ३६०८ ..१०२९०
अतिदक्षता १८८६... ८०३.... १०८३
ऑक्सिजन ८३१६ .... १८६४..... ६४५२
व्हेंटिलेटर ११३७ ... ५६४ ..... ५७३