Join us

बायफोकलच्या दुसऱ्या यादीत ५०५७ विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:28 AM

अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये ५०५७ विद्यार्र्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

मुंबई : अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये ५०५७ विद्यार्र्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.अकरावी प्रवेशातील बायफोकल विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातील कॉलेजांत असणाºया २६ हजार ९०४ जागांसाठी दुसºया फेरीसाठी ९५०६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शाखानिहाय बायफोकल विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील विषयांसाठी केवळ २ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. या सर्वांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले. वाणिज्य शाखेतील ४४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. विज्ञान शाखेतील जागांसाठी तब्बल ९२२०, तर वाणिज्य शाखेसाठी २८४ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे लक्षबायफोकलच्या दुसºया गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात २९ व ३० जून २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रवेश निश्चित करायच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या. त्यानंतर प्रवेशाचा मुख्य फेरींना सुरुवात होईल.त्यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. याकडे सर्व विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. महाविद्यालयातील बायफोकलच्या उर्वरित आणि रिक्त जागांसाठी १ ते ४ आॅगस्टदरम्यान महाविद्यालयीन स्तरावर अर्ज मागवण्यात येणार आहेत. हे प्रवेश आरक्षण आणि गुणवत्तेनुसार देण्यात येतील.के.सी. कॉलेजकॉम्प्युटर सायन्स (विनाअनुदानित)- ९०.४०इलेक्ट्रॉनिक्स (विनाअनुदानित) -८७इलेक्ट्रिकल मेंटेनन्स (विनाअनुदानित) - ८८.६०जयहिंद कॉलेजकॉम्प्युटर सायन्स (विनाअनुदानित)- ९१.८३इलेक्ट्रॉनिक्स ( विनाअनुदानित) -८८. ८०रुईया कॉलेजकॉम्प्युटर सायन्स (विनाअनुदानित)- ९४.८०इलेक्ट्रॉनिक्स (अनुदानित) - ९७.२०मिठीबाई कॉलेजकॉम्प्युटर सायन्स (विनाअनुदानित)- ९२.६०इलेक्ट्रॉनिक्स (विनाअनुदानित)- ८९.२०