Join us

दुसऱ्या यादीत ९५ टक्क्यांवरील प्रवेशात राज्य मंडळाचा केवळ एक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 2:36 AM

अकरावी प्रवेश; नामांकित महाविद्यालयातींल जागांवर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांची बाजी; अंतर्गत गुणांचा परिणाम

मुंबई : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी जाहीर झाली असून, यात ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाच्या केवळ एका विद्यार्थ्याचा समावेश असून, इतर मंडळाचे ४२ विद्यार्थी आहेत. त्यामुळे अंतर्गत गुणांचा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे. ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाचा केवळ एक विद्यार्थी अलॉटेड असताना, सीबीएसईचे ७, आयसीएसईचे ३४ आणि आयजीसीएसईच्या एका विद्यार्थ्याला जागा अलॉट झाली आहे. साहजिकच, नामांकित महाविद्यालयातील जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

दुसºया यादीत ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या ४३ आहे, तर ९० ते ९५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार १६ आणि ८५ ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ४३४ इतकी आहे. ८० ते ८५ टक्क्यांदरम्यानचे प्रवेश मिळालेले ४,२३१ इतकी आहे. दुसºया यादीत अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९१.९४ टक्के विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. दुसºया यादीसाठी राज्य मंडळाच्या ९९,६०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६३,६०० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे, तर सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई आणि एनआयओएस अशा इतर मंडळाचे ६६.९९ टक्के विद्यार्थी आहेत. इतर मंडळाच्या एकूण ७,४५० विद्यार्थ्यांनी दुसºया यादीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ४,९६८ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

८० ते ८४.९९ टक्क्यांदरम्यान प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,२३१ असून, यामध्ये सर्वात जास्त ३,४३३ इतके राज्य मंडळाचे विद्यार्थी आहेत, तर ८५ ते ८९ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांमध्ये १,५३५ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. याचाच अर्थ, नामांकित महाविद्यालयांतील पाहिल्या जागा इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळविण्यात यश आले आहे.

दुसºया यादीत ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या ४३ आहे, तर ९० ते ९५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार १६ आणि ८५ ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ४३४ इतकी आहे. अंतर्गत गुण देण्यात आले नसल्याचा परिणाम यंदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर झाला. त्यामुळेच अकरावी प्रवेशात ते मागे पडल्याची नाराजी पालकांमध्ये आहे.

टॅग्स :विद्यार्थी