दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:43 AM2019-03-03T03:43:24+5:302019-03-03T13:20:05+5:30
मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरील मोनो रेल्वे रविवारपासून धावेल.
मुंबई : मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरील मोनो रेल्वे रविवारपासून धावेल. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या टप्पा दोनचे रविवार, ३ मार्चला सायंकाळी ६ वाजता महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौक स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकर्पण होईल.
मोनो रेल्वेचा पूर्ण मार्ग हा १९.५४ किलोमीटर लांबीचा आहे. चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे लागत होती. आता दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर यासाठी अवघी ३० मिनिटे लागतील. या टप्प्यावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनोरेल्वे प्रत्येकी २२ मिनिटांनी धावेल.
दुस-या टप्प्यात जी.टी.बी. नगर, अॅण्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल, संत गाडगे महाराज चौक ही स्थानके आहेत.