खड्डे बुजविण्यात मुंबई दुस-या क्रमांकावर, नागपूर विभाग पहिल्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:05 AM2017-12-06T04:05:26+5:302017-12-06T04:06:55+5:30

प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्यात नागपूर विभाग पहिल्या क्रमांकावर असून, दुस-या क्रमांकावर मुंबई आहे़.

In the second spot in Mumbai, the Nagpur division is in the top position | खड्डे बुजविण्यात मुंबई दुस-या क्रमांकावर, नागपूर विभाग पहिल्या स्थानावर

खड्डे बुजविण्यात मुंबई दुस-या क्रमांकावर, नागपूर विभाग पहिल्या स्थानावर

Next

राजेश निस्ताने
यवतमाळ : प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्यात नागपूर विभाग पहिल्या क्रमांकावर असून, दुस-या क्रमांकावर मुंबई आहे़.  नागपूर येथील जिल्हा मार्गावरील ७१़२४ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत, तर मुंबईतील ६३ टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत़ राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्यात राज्यात अमरावती विभाग आघाडीवर आहे. मंगळवारी दुपारपर्यंत अमरावती विभागातील ९५.४९ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत़ सार्वजनिक बांधकाम खात्याने हा अहवाल दिला आहे़
राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेले खड्डे १५ डिसेंबरपूर्वी बुजलेले जातील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील बांधकाम विभाग वेगाने कामाला लागला. खरोखरच खड्डे बुजत आहेत की नाही, ते पाहण्यासाठी खुद्द बांधकाममंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेटी देत आहेत. रविवारीच त्यांनी अमरावती विभागाचा दौरा करून खड्ड्यांचा आढावा घेतला.

दिवसभरात किती खड्डे बुजविले, याचा अहवाल बांधकाममंत्र्यांना राज्यभरातून दररोज पाठविला जात आहे. या अहवालानुसार, मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील प्रमुख राज्य मार्गावरील ८६.२८ टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ५५.२४ टक्के असे एकूण ६८.२१ टक्के खड्डे बुजविले गेले आहेत. राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्यात अमरावती विभागाचा पहिला क्रमांक आहे. या विभागातील यवतमाळसह पाच जिल्ह्यांत ९५.४९ टक्के खड्डे बुजविले गेले.

जिल्हा मार्गात मराठवाडा मागे
प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्यातसुद्धा औरंगाबाद विभाग सर्वात मागे (३७.५४ टक्के) आहे. पुणे ५९, नाशिक ५०, तर अमरावती विभागाने
६० टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविले आहेत.

Web Title: In the second spot in Mumbai, the Nagpur division is in the top position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे