मुंबई - पतीच्या मृत्यूपश्चात त्याला देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम पहिली पत्नी, तिची मुलगी व दुसºया पत्नीची मुलगी यांच्यात प्रत्येकी एक तृतीयांश वाटण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरेश हाटणकर यांचा मे महिन्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना एकूण ६६ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार व रेल्वे पोलिसांकडून मिळणार आहे. या रकमेवर त्यांची पहिली पत्नी, तिची मुलगी व दुसरी पत्नी व दुसºया पत्नीची मुलगी यांनी हक्क सांगितला. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले. मात्र, न्या. एस. जे. काथावाला व न्या. एम. जामदार यांच्या खंडपीठाने कायद्याने या रकमेवर पहिली पत्नी, तिची मुलगी आणि दुसºया पत्नीची मुलगी अधिकार सांगू शकते. त्यावर दुसºया पत्नीचा अधिकार नाही, असे याचिकादार असलेल्या दुसºया पत्नीला स्पष्ट सांगितले.कायद्यातील तरतुदींबाबत स्पष्टता दिल्यावर हाटणकर यांची पहिली पत्नी, तिची मुलगी तसेच दुसरी पत्नी व तिच्या मुलीने सामंजस्याने यावर तोडगा काढला.पुढील सुनावणी ११ सप्टेंबरलासामंजस्याने काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार, न्यायालयाने हाटणकर यांची पहिली पत्नी, तिची मुलगी आणि दुसºया पत्नीच्या मुलीला ६६ लाख रुपयांमध्ये प्रत्येकीला एक तृतीयांश वाटा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या प्रोथोनोटरीला दिले. हाटणकर यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची वाटणी अशाच प्रकारे करण्यात येईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला ठेवली आहे.
नुकसानभरपाईच्या रकमेत दुसऱ्या पत्नीच्या मुलीलाही वाटा, पहिली पत्नी, तिच्या मुलीचाही अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:40 AM