मुंबई : पुढील आर्थिक वर्षात मोने रेल प्रकल्पातील सुरक्षारक्षकांसाठी ५ कोटी ३५ लाख रुपये खर्च करावे लागणार असून, श्वान पथकांचा खर्चही १ कोटी ६९ लाखांवर जाणार आहे. मोनोला तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न जेमतेम ६ कोटीच आहे. सुरक्षा व्यवस्थेवर जेवढा खर्च होतो, तेवढेही उत्पन्न मोनोला कमावता येत नाही, हे यातून अधोरेखित होते. धक्कादायक बाब म्हणजे, तिकीट वाटप व्यवस्थेवर ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च होत असून, तो तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६१ टक्के आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी १९.५४ किमी लांबीच्या देशातल्या एकमेव मोनो रेल्वेतून आजच्या घडीला दैनंदिन सरासरी १० हजार प्रवासीसुद्धा नाहीत. ८ किमी लांबीची मार्गिका असताना प्रवाशांची संख्या सात हजार होती. ती जेमतेम तीन हजारांनी वाढली आहे. पुढील वर्षात त्यात १० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होत असून, तोट्याचे आकडेही फुगत चालले आहेत. मोनोच्या फेºया वाढविण्याचा मानस असला, तरी ते तंत्रज्ञान असलेली कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. पर्यायी कंपन्यांकडून काम मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएची दमछाक होत आहे.देखभाल खर्च ५.७४ कोटीया मोनोरेलची निगा आणि देखभाल करण्यासाठी पुढल्या वर्षभरात ५ कोटी ७४ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्या कामांसाठी वरिष्ठ अभियंत्यापासून ते हेल्परपर्यंत १३८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. १५४ सफाई कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च ४ कोटी ४४ लाखांवर जाणारा आहे.तिकीट वाटपही डोईजड : मोनेरेलच्या तिकीट वाटपाचे काम आउटसोर्सिंग पद्धतीने केले जाते. येत्या वर्षासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी १८२ कर्मचाºयांची आवश्यकता असून, या संपूर्ण व्यवस्थेसाठी १८२ कर्मचाºयांची आवश्यकता असेल. त्यासाठी ३ कोटी ७३ लाख रुपये मोजावे लागतील. तिकिटाचे उत्पन्न ६ कोटी ८ लाख असताना, केवळ तिकीट वाटपासाठी दुपटीपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.