सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये मग्न, मुंबईची सुरक्षा रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 02:22 PM2019-04-06T14:22:51+5:302019-04-06T14:25:23+5:30

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच मोबाईल हा अविभाज्य भाग बनला आहे त्यावर तसा कोणाचाच आक्षेप नसावा त्यामुळे मोबाईल विरंगुळ्यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत.

Security guard busy in Mobile, Mumbai Security threatens | सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये मग्न, मुंबईची सुरक्षा रामभरोसे

सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये मग्न, मुंबईची सुरक्षा रामभरोसे

Next

विनायक पात्रुडकर

मुंबई - विरंगुळा करण्यासाठी अनेक साधने आहेत़ चित्रपट, नाटक, सर्कस, अशी मोठी यादी आपल्याला सापडेल़ आता त्यात मोबाईलची भर पडली आहे इंटरनेट सेवेमुळे मोबाईल हे विरंगुळ्याचे उत्तम साधन झाले आहे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच मोबाईल हा अविभाज्य भाग बनला आहे त्यावर तसा कोणाचाच आक्षेप नसावा त्यामुळे मोबाईल विरंगुळ्यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत 

मोबाईल निर्बंधांचे सल्ले आवर्जुन दिले जातात़ मात्र मुंबई महापालिकेच्या काही सुरक्षा रक्षकांना मोबाईलचा विरंगुळा चांगलाच भोवला आहे़ कर्तव्यावर असताना मोबाईलवर गेम खेळणे, चित्रपट बघणे, सतत बोलणे, या गुन्ह्यांसाठी पालिकेने २५ सुरक्षा रक्षकांना दोन ते तीन हजार रूपये दंड ठोठावला आहे वेतनातून हा दंड वसूल केला जाणार आहे काहींना मेमो काढला आहे. पालिकेची ही कारवाई सर्वांनाच अचंबित करणारी आहे. कर्मचारी संघटनांनी याचा निषेधही नोंदवला आहे. खरेतर या कारवाईचे स्वागतच करायला हवे. 

सुरक्षा रक्षकाची जबाबदारी रक्षण करण्याची आहे, मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. सुरक्षा रक्षकांनी सर्तकच राहायला हवे. प्रत्यक्षात काही पालिका सुरक्षा रक्षक मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. अशी परिस्थितीती केवळ पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचीच आहे असे नाही, खासगी सुरक्षा रक्षकांना तर कसलेच बंधन नाही. परिणामी बहुतांश खासगी सुरक्षा रक्षक सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. पोलीस दलही यातून सुटलेले नाही. बहुतांश ठिकाणी पोलीस हवालदार हे मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. महिला पोलीस याला अपवाद नाहीत यांच्यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्न आहे. यावर कारवाई होणे आवश्यक आहे. 

मुंबई महापालिकेने याची सुरूवात केली आहे. याचे अनुकरण इतर आस्थापनांनी घ्यायला हवे. शाळा, महाविद्यालयात मोबाईल बंदीची मागणी केली जाते व त्याचा अंमलही होतो. अशा प्रकारे सुरक्षा रक्षक वापरत असलेल्या मोबाईलवर काही प्रमाणात निर्बंध आणायला हवेत. मोबाईल गरज आहे, हे मान्य, पण त्याचा सतत वापर नको़ मोबाईलला इंटरनेट बंदी किंवा कामाच्या ठिकाणी नेट जॅमर बसवणे, असे पर्याय केले जाऊ शकतात. त्याचा विचार झाला पाहिजे. तरच मुंबईचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या हातात सतत मोबाईल राहणार नाही. अन्यथा मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होईल आणि सुरक्षा रक्षक मोबाईलमध्ये मग्न असतील.  
 

Web Title: Security guard busy in Mobile, Mumbai Security threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.