कार अपघातात सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:16+5:302021-03-25T04:07:16+5:30
चारकोपमधून शिक्षिकेला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कारने दिलेल्या धडकेत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. कांदिवलीच्या चारकोप परिसरात हा ...
चारकोपमधून शिक्षिकेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारने दिलेल्या धडकेत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. कांदिवलीच्या चारकोप परिसरात हा अपघात घडला असून याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली.
चारकोपच्या गौरव को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या इमारतीत ज्ञानदेव मोरे हे सुरक्षारक्षक (५८) म्हणून कार्यरत होते. मनाली भाटिया (२९) या व्यवसायाने शिक्षिका असून त्यांची गाडी गेटमधून आत येत असल्याने मोरे यांनी इमारतीचे प्रवेशद्वार उघडले. मात्र, भाटिया यांचा पाय अचानक ॲक्सिलेटरवर पडला आणि त्यामुळे कारचा वेग वाढला व ती जाऊन मोरे यांना धडकली. यात मोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली. मोरे हे मूळचे साताऱ्याचे राहणारे असून काही महिन्यांपूर्वी ते नोकरीसाठी मुंबईत आले होते. याबाबत आरटीओकडेही पोलिसांनी अहवाल मागितला आहे.
......................