ठाण्यासाठी सुरक्षारक्षक भांडुपचेच
By admin | Published: June 28, 2014 11:31 PM2014-06-28T23:31:22+5:302014-06-28T23:31:22+5:30
महापालिकेच्या 385 सुरक्षारक्षकांच्या भरतीला पुन्हा एकदा ग्रहण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Next
>ठाणो : महापालिकेच्या 385 सुरक्षारक्षकांच्या भरतीला पुन्हा एकदा ग्रहण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांवरच पालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी येऊन ठेपणार आहे. त्यामुळेच गेले कित्येक वर्षे बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना परत पाठवा असा कांगावा करणा:या नगरसेवकांनीच आता त्यांना कायम पालिकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील ठराव नुकताच महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे या सुरक्षारक्षकांना मागील तीन महिन्यांचे रखडलेले वेतनही मिळणार असून आता त्यांना परत जावे लागणार नाही.
ठाणो महापालिकेची सुरक्षारक्षक भरती रखडल्याने आणि आता याच भरतीवर काहींनी आक्षेप नोंदवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने या भरती प्रक्रियेला ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. परंतु ही भरती प्रक्रिया रखडल्याने बोर्डाच्या 385 सुरक्षारक्षकांना तीन महिन्यांच्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. तसेच पालिकेच्या सुरक्षारक्षक भरतीला लागलेल्या ग्रहणाचे वृत्तदेखील प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जोर्पयत पालिकेत सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोर्पयत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना ठेवण्याचा प्रस्ताव सुरक्षारक्षक विभागामार्फत तयार करण्यात आला होता. महापालिकेने 2क्क्3मध्ये प्रथम भांडुप बोर्डाचे 65 सुरक्षारक्षक घेतले होते. त्यानंतर महापालिकेतील सुरक्षारक्षकांची संख्या टप्प्याटप्प्याने घटल्याने, पालिकेने बोर्डाचे 385 सुरक्षारक्षक आपल्या दावणीत सामील करून घेतले. त्यानंतर तीन वर्षापूर्वी महापालिकेने स्वत:चे सुरक्षारक्षक घेण्यास सुरुवात करून पहिली भरती प्रक्रिया सुरू केली. या वेळी 65 सुरक्षारक्षकांसाठी 17 हजारांच्या आसपास अर्ज आले होते. परंतु या वेळी यात महापालिकेकडून चूक झाल्याने एका उमेदवाराने पालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर या प्रक्रियेला स्थगिती आली. त्यामुळे महापालिकेला पुन्हा बोर्डाच्या सुरक्षारक्षकांवर विसंबून राहावे लागले. अखेर मागील वर्षी 385 सुरक्षारक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि पालिकेने भरती सुरू केली. परंतु पालिकेने ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्याने या भरती प्रक्रियेचा पुरता फज्ज उडाला. तसेच इच्छुक उमेदवारांची यादी इंटरनेटवर प्रसिद्ध केल्यानंतर अपेक्षित उमेदवारसुद्धा या प्रक्रियेला हजर राहिले नाहीत. तसेच पालिकेने 7क् टक्केला यादी क्लोज केल्याने, त्याचे पडसादही उमटले. काही नाराज उमेदवारांनी आता या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
च्पालिकेला आपण केलेली ही चूक दिसू लागल्याने आता नगरसेवकांनासुद्धा ही प्रक्रिया रखडणार असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांनी आता आपली मदार पुन्हा बोर्डाच्या सुरक्षारक्षकांवर वळविली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत वारंवार बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या वाढीव कालावधीचा ठराव जेव्हा जेव्हा येत होता, तेव्हा तेव्हा, सदस्यांनी याला विरोध करून पालिकेने हक्काचे सुरक्षारक्षक घ्यावेत असा सूर लावला होता.
च्परंतु शुक्रवारच्या महासभेत हा सूर काहीसा मावळल्यासारखा दिसून आला. भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पटलावर येताच, त्याला तत्काळ मंजुरी देतानाच, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी जलकुंभ, स्मशानभूमी आणि इतर ठिकाणच्या सुरक्षेच्या जबाबदारीचे कारण पुढे करून बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना पालिकेत कायम ठेवण्यात यावे, अशी सूचना मांडली आणि त्याला इतर सदस्यांनी अनुमोदनसुद्धा दिले. त्यामुळे ते आता पालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाल़े