मुंबई : राज्यातील जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाअंतर्गत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना ११ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही दरमहा वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाने केली आहे. या मागणीसाठी आझाद मैदान येथे त्यांनी बुधवारी आंदोलन केले.महासंघाचे उपाध्यक्ष शंभू खंडाळे म्हणाले, राज्य सरकारच्या आरोग्य विभागात, विविध जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात ते काम करीत आहेत. काही ठिकाणी ११ महिने, तर काही ठिकाणी वर्षभरापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. मंडळाकडे वेतन मागितल्यास सरकारने निधी दिला नसल्याचे सांगण्यात येते.यामुळे सुरक्षारक्षकांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे. त्यांना अन्य मंडळांप्रमाणे खाकी रंगाचा आकर्षक गणवेश देण्यात यावा. जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून काम करणाºया सुरक्षारक्षकांसाठी स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यात यावीत आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
सुरक्षारक्षकांनाही हवे दरमहा वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:36 AM