सुरक्षारक्षक वर्षभर वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:55+5:302021-01-08T04:13:55+5:30
मुंबई : राज्यातील जिल्हा सुरक्षारक्षक मंडळअंतर्गत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना वर्षभरापासून वेतन मिळाले नसून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुरक्षारक्षकांनाही दरमहा वेतन ...
मुंबई : राज्यातील जिल्हा सुरक्षारक्षक मंडळअंतर्गत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना वर्षभरापासून वेतन मिळाले नसून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुरक्षारक्षकांनाही दरमहा वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आझाद मैदान येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
याबाबत महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा आश्विनी सोनावणे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या आरोग्य विभागात विविध जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात काम करीत आहेत. त्यांना वर्षभरापासून वेतन मिळाले नाही. सुरक्षारक्षकांना हे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे. सुरक्षारक्षकांना अन्य मंडळाप्रमाणे खाकी रंगाचा आकर्षक गणवेश देण्यात यावा. १५ जिल्हा सुरक्षारक्षक मंडळे एकत्रीकरण करून एकच सक्षम मंडळ तयार करण्यात यावे, सुरक्षारक्षकांचा पीएफ हा पीएफ कार्यालयातच जमा करावा. शासनाच्या नव्याने स्थापन होणाऱ्या सल्लागार समितीवर उच्चशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. सर्व कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक द्यावेत असेही त्या म्हणाल्या.