Join us

सुरक्षारक्षकांचे वर्षभरापासून वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

मुंबई : सुरक्षारक्षकांचा वेतनवाढीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांमार्फत मंडळातील अधिकाऱ्यांच्या विरोधात काळ्या फिती लावून जाहीर ...

मुंबई : सुरक्षारक्षकांचा वेतनवाढीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांमार्फत मंडळातील अधिकाऱ्यांच्या विरोधात काळ्या फिती लावून जाहीर निषेध करणार आहेत.

माय बळीराजा सुरक्षारक्षक युनियनचे कोषाध्यक्ष मारुती झाडे म्हणाले की, सुरक्षारक्षकांमार्फत मंडळातील अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरक्षारक्षक काळ्या फिती लावून जाहीर निषेध करणार आहेत. सुरक्षारक्षकांचा १ जून २०२० रोजी करार संपून वेतनवाढ निश्चित करण्याची अपेक्षा सुरक्षारक्षकांना होती, परंतु मंडळातील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही.

कोरोना काळात आपल्या जिवाची बाजी लावून सर्व सुरक्षारक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहेत. तरी मंडळातील अधिकाऱ्यांना जराही माणुसकी, आपुलकी दिसून येत नाही. कामगारमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून सुरक्षारक्षकांची वेतन वाढ लवकरात लवकर मिळवून द्यावी, सुरक्षारक्षकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करणार असल्याचेही झाडे यांनी सांगितले.