Join us

सुरक्षारक्षकांनाही कोविडची लस देण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:06 AM

सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी; केंद्राला लेखी पत्राद्वारे विनंतीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुरक्षारक्षक हेदेखील अत्यावश्यक सुविधेत मोडत ...

सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी; केंद्राला लेखी पत्राद्वारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुरक्षारक्षक हेदेखील अत्यावश्यक सुविधेत मोडत असून, ते फ्रंटलाईन वाॅरिअर्स आहेत. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लस टोचण्यात यावी, अशी मागणी सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे. त्यासाठी त्यांनी एक पत्र केंद्राला दिले आहे.

भारत सरकारने खासगी सुरक्षारक्षकांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी असून, कोरोना काळात जीव धोक्यात घालून चोवीस तास सेवा बजावणाऱ्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लस देण्यात प्राथमिकता द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली आहे. सुरक्षारक्षक हे कंटेन्मेंट झोन, हॉटेल्स, रुग्णालय, तसेच अनेक संवेदनशील ठिकाणी कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून ते ही सेवा बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही यामुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर ही लस दिली जाईल याबाबत पावले उचलण्याबाबत संबंधिताना निर्देश द्यावे, अशी विनंती पत्रात करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष गुरुचरणसिंह चौहान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

............................