Join us  

बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:03 PM

Diployed CRPF Units : केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई : बंडखोर आमदार उद्या गोव्याहून मुंबईत दाखल होणार आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार असून बंडखोर आमदार सुद्धा उद्या मुंबईत येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत सीआरपीएफचे (CRPF) २ हजार जवान दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांनी जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस तयारीला लागले होते. तरीदेखील केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याआधी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रात झालेल्या परिस्थिती आढावा घेता केंद्राने सीआरपीएफ जवानांच्या तुकड्या मुंबईत पाठवल्या आहेत. विशेष तीन विमानाने मुंबईत २ हजार जवान दाखल झाले आहेत. 

उद्या बहुमत चाचणी होणार असून बंडखोर आमदार देखील या चाचणीत आपलं मत देणार आहेत. त्यासाठी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षा कवचामध्ये बंडखोर आमदारांना बसने विधानभवनपर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी बाळगली जाणार आहे. तसेच भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. कोणतीही प्रक्षोभक वक्तव्य करून नये आणि कोणतीही बॅनरबाजी करू नये अशा प्रकारच्या नोटीस देण्यात आली आहे. 

टॅग्स :सैनिकएकनाथ शिंदेमहाराष्ट्रराजकारण