विमानतळासारखी सुरक्षा रेल्वे स्थानकांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:00 AM2019-01-08T02:00:31+5:302019-01-08T02:00:56+5:30

प्रवाशांच्या नियंत्रणासाठी निर्णय : पश्चिम रेल्वेमार्गावर होणार सुरुवात

Security at railway stations like the airport | विमानतळासारखी सुरक्षा रेल्वे स्थानकांवर

विमानतळासारखी सुरक्षा रेल्वे स्थानकांवर

Next

मुंबई : स्मार्ट कार्ड, प्लॅस्टिक कॉइन, इतर सुविधा आता रेल्वे स्थानकावर येण्याची शक्यता आहे. सर्वांत आधी पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार या स्थानकांवर ही सुविधा अंमलात आणण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर २० ते २५ मिनिटे आधीच यावे लागेल. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे नियंत्रण होण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेच्या सहा स्थानकांवर ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे प्रायोगिक तत्त्वावर ही उपाययोजना अंमलात आणली जाणार आहे.

स्मार्ट कार्ड, प्लॅस्टिक कॉइन यासारखी सुविधा आता विमानतळ, मेट्रो येथे आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रवासी शिस्तबंध पद्धतीने रांगेत उभा राहून प्रवास करतो. हीच योजना आता या वर्षी रेल्वे स्थानकावर येण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये ही सुविधा सकाळ आणि सायंकाळच्या गर्दी वेळी कितपत लागू होऊ शकेल, यात शंका आहे. मुंबईवर प्रत्येक स्थानकावर दररोज सुमारे तीन लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे ही सुविधा वास्तवात अंमलात येईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मेट्रोप्रमाणे रेल्वे स्थानकावर प्रवेश करताना आणि स्थानकातून बाहेर पडताना सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना अंमलात येणे आवश्यक आहे. या उपाययोजनेबाबत विचार सुरू आहे. याविषयी नियोजनाची आखणी करण्यात येत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी असेल सुरक्षा
च्रेल्वे स्थानक व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्क्रिनिंग
च्रेल्वे स्थानकात प्रवाशांना तपासणीनंतरच प्रवेश
च्रेल्वे बॉम्बशोधक-नाशक यंत्रणाही उभी करणार
च्प्रवाशाच्या चेहºयाची ओळख पटविणारे ‘रिअल टाइम सॉफ्टवेअर’
च्एखाद्याची संशयास्पद हालचाल दिसल्यास परिसरात आढळल्यास यंत्रणांना माहिती मिळणार
च्संशयास्पद व्यक्ती दिसल्यास यंत्रणा अलर्ट होऊन तत्काळ त्या व्यक्तीस ताब्यात घेईल
च्रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेसाठी ३८५ कोटींचा खर्च अपेक्षित

रेल्वे स्थानकाच्या चारही बाजूंस सुरक्षित भिंती उभारण्यात येणार आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वारांचा अभ्यास करून सर्व बाजू सुरक्षित केल्या जातील. प्रवेशद्वारांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील. रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी केली जाईल. या तपासणीनंतरच प्रवाशाला आत प्रवेश दिला जाईल. यामुळे विमानतळाप्रमाणे प्रवाशांना आपली गाडी सुटण्याच्या वेळेच्या किमान १५ ते २० मिनिटे आधीच रेल्वे स्थानकात पोहोेचावे लागणार आहे, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Security at railway stations like the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.